शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'या' राज्यांमध्ये का धोकादायक ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 08:30 IST

coronavirus : ओआरएफने २७ ऑगस्टपर्यंत कोविड लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.

नवी दिल्ली : देशात कोविड लसीकरण वेगाने सुरू आहे. आतापर्यंत देशातील १६ टक्के वयस्कर लोकांना पूर्णपणे लस देण्यात आली आहे. तरीही  ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कमी लसीकरण प्राणघातक ठरू शकते. तिसऱ्या लाटेच्या भीतीने अनेक राज्यांमध्ये या वयाच्या लोकांच्या लसीकरणाचे आकडे चिंतेचे कारण ठरत आहेत. 

तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या जास्त आहे. ओआरएफ कोविड व्हॅक्सिन ट्रॅकरनुसार, एक हजार लोकसंख्येमागे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरणाचा आकडा खूपच कमी आहे. ओआरएफने २७ ऑगस्टपर्यंत कोविड लसीकरणाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.

देशात ६० वर्ष आणि त्याहून अधिक एक हजार लोकांमागे ९४७.१३ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये हा आकडा ५२३.०५, उत्तर प्रदेश ६५१.१२ आणि पश्चिम बंगाल ८५३.४८ आहे. तिन्ही राज्यांतील या वयोगटातील लोकांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १.४५ कोटी लोक आहेत, परंतु अशा एक हजार लोकांमध्ये ९५१.१२ डोस देण्यात आले आहेत. जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडे जास्त आहे.

पुढची लाट 'या' राज्यांसाठी आव्हानात्मकतामिळनाडू आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे सरासरी लसीकरण वाढले नाही तर कोविडची पुढची लाट या राज्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. ओआरएफनुसार, २७ ऑगस्टपर्यंत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ६१.६ टक्के लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३१.४ टक्के लोकांना पूर्णपणे लस दिली आहे.

छोट्या राज्यांमधील लसीकरण सिक्कीम, मिझोराम, लक्षद्वीप, चंदीगड आणि अंदमान आणि निकोबार सारख्या छोट्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात लसीकरण होणाऱ्या हजार लोकांमागे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे. वृद्धांसाठी संपूर्ण लसीकरण खूप महत्वाचे आहे, कारण या वयाच्या लोकांमध्ये इतर आजारांची संख्या जास्त आहे. यामुळे हे लोक संसर्गाबद्दल खूप संवेदनशील असतात. व्हायरसच्या संसर्गापासून लस पूर्णपणे संरक्षित नसली, तरी लसीचे दोन्ही डोस घेतल्याने संसर्गाची तीव्रता आणि मृत्यूचा धोका कमी होतो, असे आढळले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या