शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus News: दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 06:42 IST

मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणणार

नवी दिल्ली : किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, भाजी, फळविक्रेते यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.या लोकांपैकी जे कोरोनाग्रस्त असतील त्यांच्यामुळे या संसगार्चा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्यात यावी, असे सरकारने म्हटले आहे.केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांसाठी असलेल्या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा असायलाच हवी. एखाद्या रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी संपर्क साधल्यानंतर किती वेळात त्यांच्याकडे रुग्णवाहिका पोहोचते किंवा रुग्णवाहिका येण्यास नकार मिळतो यावर राज्यांनी दररोज बारीक लक्ष ठेवले पाहिजे. नकाराचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.वयोवृद्धांची काळजी घ्या : आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, घरोघरी जाऊन चाचणी करण्याचेही अनेक फायदे आहेत. घरातील वयोवृद्ध, गरोदर महिला यांच्या प्रकृतीला कोरोनामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना जपणे अतिशय महत्त्वाचे आहे.ऑगस्टमध्ये भारतात सापडले सर्वाधिक नवे रुग्णऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अमेरिका, ब्राझिलमधील नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. शुक्रवारी ६१,३३७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०,८८,६११ झाली आहे.कोरोनामुळे आणखी ९३३ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या ४२,५१८वर पोहोचली आहे.सध्या देशात ६,१९,०८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून १४२७००६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६८.३२ टक्के झाले आहे. सलग दहाव्या दिवशी कोरोनाचे ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या