शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:56 IST

गावे सक्षम करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : कोरोनामुळे जग बदलेल. बदलेल्या जगासोबत आपल्याला गावे सक्षम करावी लागतील. स्वयंसिद्ध स्वयंपूर्णता हाच कोरोनाचा सर्वात मोठा धडा आहे. त्यामुळे आपल्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे लागेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भारतासाठी दिला. कोरोनाला रोखण्यासाठी दोन फूट अंतर हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगून मोदींनी फिजिकल डिस्टन्सिंगची सोपी व्याख्या केली. राष्ट्रीय पंचायत दिनी पंतप्रधानांनी देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. लॉकडाऊनची परिस्थिती, गावकऱ्यांचे अनुभव त्यांनी जाणून घेतले.सार्वजनिक सेवा केंद्रामुळे गावकऱ्यांची सोय झाली. तात्काळ मदत मिळू लागली. कधीकाळी केवळ १०० ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड होते. आता भारतनेट योजनेमुळे सव्वा लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायती इंटरनेटशी कनेक्ट होतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ई- ग्राम स्वराज पोर्टलचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. गावागावांतील विकासकामांची माहिती त्यावर अपडेट करण्यात येईल. ई-स्वराज पोर्टलमुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येईल.काय म्हणाले मोदी?आपल्या कामाची पद्धत बदलली आहे. संपर्क येणार नाही ही नवी कामाची व्यवस्था उभारावी लागेल. गावाने संघटित व्हावे. प्रत्येक शेतकºयाने, गावकºयाने स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.तुम्हाला सुरक्षित राहावेच लागेल. लॉकडाऊन असला तरी देशभरात धान्य, दूध, दही, फळ, भाजीपाल्याची कमतरता शेतकºयांनी भासू दिली नाही. ग्रामीण भागाने संकटकाळी मोठी मदत केली आहे. आधी (काँग्रेसच्या काळात) दिल्लीहून निधी पाठविल्यास ग्रामीण भागात केवळ १५ पैसे पोहोचायचे.गावागावांत लॉकडाऊनचे प्रभावी पालन होत आहे. गावातून मिळणारी माहिती माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही मोदींनी आवर्जून सांगितले.आता पूर्ण १०० पैसे पोहोचतात. कोरोना विषाणू न बोलावता कुणाच्याही घरी जात नाही. त्यामुळे घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या