शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मौलाना साद यांचा कोरोना अहवाल 'निगेटिव्ह', उद्या क्राइम ब्रांचसमोर हजर राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 20:25 IST

CoronaVirus : क्राइम ब्रांचकडून तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा सतत शोध सुरु आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.तबलिगी जमातमधील बर्‍याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मौलाना साद हे क्राइम ब्रांच समोर हजर राहू शकतात.

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तबलिगी जमातमधील बर्‍याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातच दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातचे प्रमुख असलेल्या मौलाना साद यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच, मौलाना साद हे क्राइम ब्रांच समोर हजर राहू शकतात.

मौलाना साद यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, मौलाना साद यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या आदेशानुसार, मौलाना साद यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर, उद्या क्राइम ब्रांचसमोर मौलाना साद हजर होऊ शकतात.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडून तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांचा सतत शोध सुरु आहे. परंतु, अद्याप क्राइम ब्रांचला यश आले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी आज तक या वृत्तवाहिनीशी मौलाना साद यांनी बातचीत केली होती. यावेळी ते म्हणाले होते, "दिल्ली क्राइम ब्रांचला माहीत आहे की मी कुठे आहे. क्राइम ब्रांचने दोन नोटीसही पाठवल्या असून त्याबाबत आम्ही आधीच उत्तर दिले आहे."

याचबरोबर मौलाना साद म्हणाले होते, "दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने माझ्या मुलाच्या उपस्थितीत घराची झडती घेतली आहे. तसेच, मला कोरोना चाचणी करण्यास सांगितले. मी कोरोनाची चाचणी केली आहे. याशिवाय, या अहवालाची माहिती दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचकडे दिली जाईल. क्राइम ब्रांच जे सांगत आहे, त्याचे आम्ही पालन करीत आहोत."

दरम्यान, मौलाना साद यांच्याबाबत अनेक खुलासे समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. अंमलबजावणी संचालनालय, क्राइम ब्रांच, दिल्ली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, मौलाना साद अद्यार सुरक्षा यंत्रणेसमोर आले नाहीत. त्यांचे ऑडिओ मेसेज सतत सोशल मीडियावर येत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्वत: क्वारंटाईन केल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली