शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या उपययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केले मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 17:32 IST

कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या देशात होत असलेल्या फैलावामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि विविध राज्यातील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोनासंबंधीच्या एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानेकेंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत मोठे विधान केले आहे. 

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्व अत्यावश्यक पावले उचलली आहेत, असे संपूर्ण देशाचे मत आहे. एकंदरीत सरकार चांगले काम करत आहे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.  कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोविड-19 विषाणूची तपासणी करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे वर्ग केली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्राने केलेल्या तयारीबाबत सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांवर आम्ही समाधानी आहोत. सरकारचे टीकाकारदेखील सरकारकडून योग्य काम करत असल्याचे मान्य केले जात आहे. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती एल. एन. राव आणि सूर्यकांत यांचाही समावेश होता.

दरम्यान, दुसरीकडे देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या