शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: सवलतींची होती अपेक्षा, पण पंतप्रधानांच्या 'त्या' घोषनेनं सगळ्यांनाच धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 11:23 IST

Coronavirus कोरोना विरुद्धच्या लढाईत पुढील एक आठवडा ठरणार महत्त्वाचा

नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन असेल. मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांच्या संयमांचं कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच प्रमाणात मदत झाल्याचं ते म्हणाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील, असा अंदाज वर्तवण्यात होता. मात्र मोदींनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत पुढील आठवडाभर निर्बंध कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं.पुढील एक आठवडा कोरोना विरुद्धची लढाई आणखी कठोर होईल. निर्बंध वाढवले जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक राज्यातल्या परिस्थितीवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल. परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध किती प्रमाणात शिथिल करायचे याबद्दलचा निर्णय होईल, असं म्हणत मोदींनी कोरोना विरुद्धच्या लढाईतील पुढची रणनीती सांगितली.एका आठवड्यानंतर जिल्ह्यांमधल्या, राज्यांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं जाईल. कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या भागांमध्ये काही प्रमाणात सवलती दिल्या जाऊ शकतात. मात्र ही सूट सशर्त असेल. लॉकडाऊनचे नियम मोडले जात असल्यास तातडीनं सगळ्या सवलती रद्द करण्यात येतील, असं मोदी म्हणाले. लॉकडाऊनचे नियम मोडल्यास कोरोना तुमच्या भागात प्रवेश करेल आणि मग देण्यात आलेल्या सवलती मागे घेण्यात येतील. त्यामुळे स्वत: बेजबाबदारपणे वागू नका आणि इतरांना बेजबाबदारपणे वागू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी