शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: प्लाज्मा उपचाराचा चौघांवर यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:10 IST

गंभीर रुग्णांसाठी रक्तदान करा : केजरीवाल

नवी दिल्ली : प्लाज्मा उपचार पद्धतीचा चार गंभीर रुग्णांवरील प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बरे झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे कळकळीचे आवाहन शुक्रवारी केले. बरे होऊन घरी परतलेले कोरोनाचे रुग्ण पुढे आल्यास गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.डिजिटल पत्रकार परिषदेत आयएलबीएसचे प्रमुख डॉ. एस.के. सरीनदेखील उपस्थित होते. त्यांच्या निरीक्षणात प्लाज्मा उपचार पद्धतीचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारने केवळ लोकनायक रुग्णालयातील गंभीर रुग्णांवर प्लाज्मा उपचारपद्धतीचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे.येत्या दोन-तीन दिवसांत आणखी काही रुग्णांवर हा प्रयोग करून आम्ही केंद्र सरकारला संपूर्ण दिल्लीसाठी याची परवानगी मागू. त्यानंतर दिल्लीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात सरकारला यश मिळू शकेल, असे केजरीवाल म्हणाले.अवयव निकामी होण्यापूर्वी विषाणू शरीरात जाणे, फुफ्फुसांना इजा पोहोचविणे आणि त्यानंतर अवयव निकामी होणे, या तीन फेजमधून कोरोनाच्या रुग्णाला जावे लागते. फुफ्फुसाला इजा झाल्यास श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे आदी त्रास जाणवू लागतात. त्याचवेळी प्लाज्मा उपचार पद्धतीचा प्रयोग केल्यास अवयव निकामी होण्यापासून वाचू शकतात, अशी माहिती डॉ. एस.के. सरीन यांनी दिली.काय आहे पद्धती?बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा गंभीर रुग्णांच्या रक्तात सोडला, तर प्राण वाचू शकतात.लोकनायकमधील चारपैकी दोन रुग्णांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे आणि आज त्यांना जनरल वॉर्डामध्ये हलविण्यात येईल.इतर दोन रुग्णांचीही प्रकृती आता हळूहळू स्थिर होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लोकनायकमधील आणखी तीन रुग्णांवर हा प्रयोग होणार आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या