शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
3
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
4
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
5
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
6
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
7
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
8
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
9
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
10
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
11
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
12
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
13
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
14
Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
15
खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही
16
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
17
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
18
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
19
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
20
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: तंबाखूजन्य पदार्थ, थुंकण्यावर राज्यांनी घालावी बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 06:01 IST

लोकांनी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी फैलावू नये यासाठी राजस्थान व झारखंडने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. या निर्णयाचे अनुकरण देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी करावे असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे.सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कुठेही थुंकण्याची सवय अनेकांना आहे. या सवयीमुळे कोरोना, क्षयरोग, स्वाईन फ्लू आदी संसर्गजन्य रोग पसरतात. जिथे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात अशा ठिकाणी कुठेही थुंकण्याच्या सवयीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे.डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, लोकांनी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास तसेच तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालून आपण केवळ स्वच्छ भारत नव्हे तर स्वस्थ भारत निर्माण करू शकू. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५मधील तरतुदीनूसार केंद्र सरकारने १ मे रोजी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून शिक्षेबरोबरच दंड वसूल करण्याचा राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना अधिकार आहे तसेच दारु, पान, गुटखा, तंबाखू आदींचे सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यास बंदीही घालता येऊ शकते.दरवर्षी १२ लाख लोकांचा मृत्यूभारतातील २६.८ कोटी लोक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन किंवा धूम्रपान करतात असे ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वेक्षणात म्हटले आहे. या व्यसनाशी संबंधित आजार होऊन देशात दरवर्षी १२ लाख लोक मरण पावतात. त्यामुळे धूम्रपान असेल किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन, ते जितक्या लवकर सोडता येईल तेवढे आरोग्यासाठी चांगले, असेही या सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या