शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: विजयवाडा येथील ५० टक्के रुग्णांचा संसर्गस्रोत गुलदस्तात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 02:33 IST

शहर बनले रेड झोन; वाढती संख्या आंध्र प्रदेशसाठी धोक्याची घंटा

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा शहरातल्या ‘कोविड-१९’ च्या रुग्णांपैकी ५० टक्के लोकांना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली याचा थांगपत्ताच लागत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे; तसेच बऱ्याच रुग्णांमध्ये लागण झाल्याची कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळली नाहीत.कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए. मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, विजयवाडा शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, ते राज्यातील नवा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहे. इतर जिल्ह्यांतील ठिकाणांपेक्षा विजयवाडा शहरात या साथीने मरण पावलेल्यांची संख्या अधिक आहे. कृष्णा जिल्ह्यात सामुदायिक संसर्गाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारपर्यंत तेथे ८० रूग्ण असून त्यापैकी ७२ विजयवाडा शहरातील आहेत. त्यातील ३० जणांना कोणाकडून हा संसर्ग झाला याचा थांगपत्ता लागत नाही. या बाधित ३० जणांनी विदेशवारी केली नाही किंवा इतर बाधितांच्या ते कधी संपर्कातही आले नाही. या कोरोनाग्रस्तांची चाचणी केली असता त्यांच्यातील ९० टक्के लोकांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती.कृष्णा जिल्ह्यासाठी १४ हजार टेस्टिंग किटआंध्र प्रदेशमधील एकूण रुग्णसंख्या ७२० वर गेली आहे. विजयवाडा शहरच आता रेड झोन बनले आहे. शहरातील २० किलोमीटरच्या परिघात मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचे निवासस्थान, विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांचे घर, तसेच राज्य सचिवालय, विधिमंडळ अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत. विजयवाडात सर्वाधिक प्रादुर्भाव झालेले १८ विभाग असून, शहरामध्ये ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कृष्णा जिल्ह्यात आतापर्यंत ४५०० जणांची कोरोना चाचणी झाली आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्यात १४००० रॅपिड टेस्टिंग किट पाठविले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या