शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

coronavirus : म्हणून बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आहे कमी, केंद्रीय टेस्टिंग लॅबने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 20:01 IST

सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या संशयित रुग्णांचे केवळ 2523 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत95 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न पश्चिम बंगाल सरकार कोरोनाच्या संशयित रुग्णांचे कमी नमुने तपासणीसाठी येत असल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या फार कमी असल्याचा आरोप

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही दिवसांत संपूर्ण देशात वेगात झाल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र असे असले तरी सुमारे नऊ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मात्र कोरोनाचे फारसे रुग्ण आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकार कोरोनाच्या संशयित रुग्णांचे कमी नमुने तपासणीसाठी येत असल्याने राज्यात कोरोनाबाधितांची संख्या फार कमी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

पश्चिम बंगाल सरकारने कोरोनाच्या संशयित रुग्णांचे केवळ 2523 नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 95 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. नॅशनल इंस्टिट्युट अॉफ कॉलरा अँड एंटरिक डिसीसच्या पश्चिम विभागाचे संचालक डॉ. शांता दत्ता यांनी ही माहिती दिली. 

यासंदर्भातील वृत्त आज तकने प्रसारित केले आहे. पश्चिम बंगालने आतापर्यंत 2523 जणांचेच नमुने तपासले आहेत. देशातील इतर राज्यांशी तुलना करता हा आकडा फार कमी आहे. 'ही आकडेवारी फार कमी आहे. गेल्या आठवड्यात तर दर दिवशी सरासरी 20 नमुनेसुद्धा तपासणीसाठी आले नव्हते. तपासणीसाठी किती जणांचे नमुने पाठवावेत राज्य सरकारवर अवलंबून आहे. जास्त नमुने पाठवले गेल्यास आम्ही जास्त तपासणी करू शकतो,' असे दत्ता म्हणाले.

'राज्यात सुरुवातीला कोरोना चाचणी करणारे केवळ आमचेच केंद्र होते. त्यावेळी आम्ही दिवसाला 90 ते 100 नमुन्यांची तपासणी करायचो. मात्र नंतर चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आमच्याकडे कमी नमुने येत असावेत, असेही दत्ता यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या चाचणी किट्स कमी पाठवण्यात आल्या, असा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप डॉ. दत्ता यांनी फेटाळून लावला आहे. आयसीएमआरने आतापर्यंत 42 हजार 500 टेस्टिंग किट्स पाठवल्या आहेत. आमच्याकडे टेस्टिंग किट्सची टंचाई नाही. आम्ही बंगालसोबतच ओदिशा आणि पोर्ट ब्लेअरसाठीही टेस्टिंग किट्स पाठवल्या आहेत. तरीही आमच्याकडे 27 हजार किट्स शिल्लक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगालMedicalवैद्यकीयIndiaभारत