शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Coronavirus :...तर पुन्हा करू नका आरटी-पीसीआर टेस्ट, कोरोना तपासणीबाबत आयसीएमआरने दिल्या नव्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:09 IST

Coronavirus News : देशामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. 

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलेला आहे. संसर्गाचा वेग प्रचंड वाढत असल्याने रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्या वाढवण्यात येत आहे. मात्र त्याचा ताण चाचणी केंद्रांवर येत आहे. पण आता कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. 

आयसीएमआरने आरटी-पीसीआर चाचण्या कमी करून रॅपिट अँटीजन चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. अनेक चाचणी केंद्रावर आलेला दबाव कमी करण्यासाठी आयसीएमआरने हा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीएमआरने केलेल्या काही महत्त्वपूर्ण सूचना पुढील प्रमाणे आहेत.  - ज्या लोकांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल, अशांची पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येऊ नये. - रुग्णालयामध्ये कोरोनाच्या संसर्गामधून बरे झाल्यानंतर डिस्चार्जच्यावेळी पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही-प्रयोगशाळांवरील दबाव कमी करण्यासाठी आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्याची अनिवार्यता संपूर्णपणे हटवण्यात यावी- ताप किंवा कोविडची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी अनावश्यक प्रवास आणि आंतरराज्यीय प्रवास टाळावा. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. - कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या व्यक्तींनी प्रवासादरम्यान, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. - राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांना मोबाइल सिस्टिमच्या माध्यमातून वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे

आयसीएमआरने आपल्या नव्या सूचनांमध्ये सांगितले की, रॅपिड अँटिजन टेस्टच्या माध्यमातून कोरोना चाचण्या करण्याची सुरुवात जून २०२० पासून झाली होती. सध्या कंटेन्मेंट झोन आणि आरोग्य केंद्रांवर या चाचणीचा वापर होत आहे. या चाचणीच्या माध्यमातून १५ ते २० मिनिटांत निदान होते, त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. 

रॅपिड टेस्टबाबतचे सल्ले रॅपिड अँटीजन टेस्ट सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात अनिवार्य करावीशहर आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजन चाचणीचे बुथ उभे करावेत.शहर आणि गावांमध्ये आरएटी बूथ शाळा-कॉलेज, कम्युनिटी सेंटर येथे हे बुथ उभारावेत. हे बुथ नियमितपणे सुरू राहावेत. स्थानिक प्रशासन आपल्या पातळीवर ड्राइव्ह थ्रू बुथसुद्धा सुरू करू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत