शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus : आणखी सहा कोरोना लसी भारतात येणार - हर्षवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:49 IST

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे.

भोपाळ : आणखी सहापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक लसी भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ( Harsh Vardhan) यांनी शनिवारी दिली. भारताने कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड या दोन लसी विकसित केल्या असून त्यांचा जगभरातील ७१ देशांना पुरवठा करण्यात आला आहे. कॅनडा, ब्राझीलसारख्या विकसित देशांचाही त्यात समावेश आहे, असे ते म्हणाले. (CoronaVirus: Six more Corona vaccines to arrive in India says Harsh Vardhan)डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा मृत्युदर सर्वात कमी आहे. कोरोनावर आता लसही उपलब्ध आहे. असे असले तरी लोकांनी निष्काळजीपणे वागू नये. गेल्या महिन्यापासून देशातील सहा राज्यांत विशेषत: महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडूमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. वारंवार आवाहन करून लोक कोरोना प्रतिबंधक नियम पाळत नसल्याने या सहा राज्यांतील अनेक गावे, शहरांमध्ये पुन्हा मर्यादित स्वरूपात का होईना लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी