शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ; २४ तासांत ६६ हजार कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:49 IST

दिलासादायक स्थिती : जगात मृत्युदर सर्वात कमी १.८४ टक्के

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत ६६,५५० रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने भारतात आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २४.०४ लाखांवर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या २५ दिवसांत रुग्ण बरे होण्याच्या दरात तब्बल शंभर टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, मृत्युदरातही घट होत आहे. भारतात मृत्युदर जगात सर्वांत कमी १.८४ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचा दर ७५.९२ टक्के आहे.

कोरोनामुक्त लोक आणि उपचार चालू असलेले एकूण रुग्ण यातील १७ लाखांहून अधिकची तफावत हे चाचण्या व योग्य उपचाराच्या सरकारी धोरणाचे यश होय. उपचार घेणाऱ्यांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३.४१ पट अधिक आहे.लस मिळवण्यासाठी रशियासोबत चर्चा सुरूरशिया । कोविड १९ वर रशियाने सर्वात आधी तयार केलेली लस मिळवण्यासाठी भारताने त्या देशाशी चर्चा सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी ही माहिती दिली. रशिया व भारत मिळून या लसीचे उत्पादन तयार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे रशियानेही म्हटले आहे. स्पुटनिक ५ कोविड १९ असे या लसीचे नाव आहे.

चीनचीननेही कोरोनावरील लस तयार केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना ती २२ आॅगस्टपासून देण्यास सुरुवात केली आहे. चीननेच मंगळवारी ही माहिती दिली.भारत । भारतात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोवीशिल्ड ही लस मंगळवारी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात देण्यास सुरुवात झाली. ही या लसीची दुसरी चाचणी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनrussiaरशिया