शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कोविडची दुसरी लाट : ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची भीती, महागाई वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:46 IST

सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत. 

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागात साथीचा प्रसार खूपच व्यापक आहे. याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला दोन पातळ्यांवर फटका बसू शकतो. एक म्हणजे प्राथमिक मंडयांच्या पातळीवर वितरण साखळी विस्कळीत होऊन अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून खाद्य क्षेत्रातील महागाई वाढण्याचा धोका आहे. दुसरी बाब म्हणजे, यंदा ग्रामीण रोजगाराची हमी देणाऱ्या मनरेगा योजनेवर प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मागणी घटून अर्थव्यवस्थेची मोठी हानी होऊ शकते.

सेन यांनी सांगितले की, भारताला अन्नधान्यांची आयातही करावी लागू शकते. त्याचा जागतिक बाजारातील धान्याच्या किमतीवर परिणाम होईल. कारण या समस्येचा सामना करणारे आपण जगात एकटे नाही आहोत. 

सर्वच विकसनशील देशांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. गेल्या वर्षीच्या साथीत ग्रामीण अर्थव्यवस्थेने देशाला तारले होते. यंदा ग्रामीण भागच नेमका अधिक संकटात आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.

मनरेगा कामांची मागणी घटू शकतेभारताचे माजी मुख्य सांख्यिकीविद प्रणब सेन यांनी सांगितले की, यंदाच्या साथीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य हे आहे की, ती ग्रामीण भागात वेगाने पसरत आहे. त्यामुळे ग्रामीण पुरवठा साखळी फारच आधीच्या पातळीवर विस्कळीत होताना दिसत आहे. त्याचा  शेती उत्पादनावर परिणाम होणे अटळ आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यामुळे यंदा मनरेगाच्या कामांची मागणी घटू शकते. त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या मागणीवर होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस