शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पंतप्रधानांच्या आवाहनाला संघ प्रतिसाद देणार, 'जनता कर्फ्यू' पाळणार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 20:19 IST

Coronavirus: जनता कर्फ्यूला संघाची बगल; उद्या होणाऱ्या शाखेच्या वेळात बदल

नागपूर: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालीय. शाळा, महाविद्यालयं, ट्रेन, मेट्रो, मॉल, बाजारपेठा, धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (२२ मार्चला) जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलंय. सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास जनता कर्फ्यू पाळला जावा, असं मोदींनी म्हटलंय. मात्र या दिवशीदेखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरूच राहणार आहेत. उद्या संघाच्या शाखांची वेळ बदलण्यात येईल, अशी माहिती संघानं ट्विटरवरुन दिलीय. रविवारी होऊ घातलेला जनता कर्फ्यू पाहता, सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री साडे नऊच्या नंतर शाखा सुरू होईल, असं आरएसएसनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलंय. संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हवाल्यानं हे ट्विट करण्यात आलंय. 'माननीय पंतप्रधानांचं २२ मार्चचं जनता कर्फ्यूचं आवाहन लक्षात घेता त्या दिवशी शाखा सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री ९.३० च्या नंतर होतील. आपापल्या विभागात, मोहल्ल्यात किंवा सोसायटीत काही स्वयंसेवक एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात,' असं संघानं ट्विटमध्ये म्हटलंय. 

उद्याच्या शाखा घेत असताना संघ वेळेत बदल करणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या वेळेत संघाच्या शाखा होणार नाहीत. मात्र केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत सगळ्यांकडून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात असताना संघ शाखा का बंद करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मंदिरं, मशिदीपासून शाळा, महाविद्यालयं, हॉटेल, मॉल्स अशी सगळीच गर्दीची ठिकाणं बंद केली जात असताना संघानंदेखील शाखा बंद करून कोरोनाचा संसर्ग टाळावा, असा एक मतप्रवाह पाहायला मिळतोय. गुरुवारी (१९ मार्चला) पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन देशवासीयांना केलं. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी जनता जनतेसाठी स्वयंस्फूर्तीनं कर्फ्यू पाळेल, असं मोदी म्हणाले होते. त्यावेळी संघानं पंतप्रधानांच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात येईल, असंदेखील संघानं म्हटलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदींनी केलेल्या आवाहनाला संघाचा पाठिंबा असेल. संघाचे स्वयंसेवक संकल्प आणि संयम या मंत्रानुसार २२ मार्चला योगदान देतील, असं संघानं आधी म्हटलं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ