शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ई-कॉमर्सला दिलेली सूट अन्यायकारक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 04:25 IST

किरकोळ क्षेत्रावरील बंदी कायम ठेवतानाच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा कंपन्यांनी जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंचेही वितरण करावे अशी सवलत देण्यात आली आहे.

मुंबई : लॉकडाउनमधून ई-कॉमर्स कंपन्यांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. किरकोळ क्षेत्रावरील बंदी कायम ठेवतानाच अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा कंपन्यांनी जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंचेही वितरण करावे अशी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे किरकोळ क्षेत्राचे कंबरडे मोडणार असून कोरोनाचे हॉटस्पॉट, रेड झोन अशा बाधित क्षेत्रात या कंपन्यांचे कामकाज कसे चालणार, या प्रश्नावर प्रशासनाकडे कोणतेच उत्तर सध्या नाही.केंद्रीय गृहमंत्रालयाने ई-कॉमर्स कंपन्यांना सूट देत २० एप्रिलपासून कामकाजाला परवानगी दिली आहे. सरकारचा हा निर्णय किरकोळ व्यापारी क्षेत्र संपविण्याचा प्रयत्न असल्याची भावना या व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय, या कंपन्यांची गोदामे व वितरण प्रणाली यामुळे हॉटस्पॉट संदर्भातील नियमांचे पालन कसे होणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे.देशामध्ये एकूण सहा कोटी रिटेलर आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील संख्या पंधरा लाख आहे. कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेतील रिटेलर्सनी काम करून आपली बांधिलकी जोपासली. या काळात ई-कॉमर्स कंपन्या लोकांच्या गरजा भागवू शकल्या नाहीत. तरीही आता केवळ त्यांनाच सर्व वस्तूंच्या विक्रीची परवानगी दिली आहे. देशभरात किरकोळ दुकानदारांकडे भरपूर माल पडून आहे. तो कधी विकला जाईल, अशा विवंचनेमध्ये व्यापारी अडकला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये ई-कॉमर्सला विरोध असल्याचे रिटेलर असोसिएशन आॅफ इंडियाचे वीरेंद्र शहा यांनीही म्हटले आहे.लॉकडाउनमध्ये वस्तू वितरणाची परवानगी; किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये नाराजी‘एकत्रितच विक्रीची परवानगी द्यावी’ई-कॉमर्सला लॉकडाउनमधून सूट का? ई-कॉमर्स व किरकोळ व्यापारी यांना एकत्रितच विक्रीची परवानगी द्यावी. अन्यथा लॉकडाउन शिथिल झाल्यावरच दोन्ही क्षेत्रांनी व्यापार सुरू करावा.तोपर्यंत आॅनलाइन कंपन्यांना कुठलीही परवानगी देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही खोडके यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याamazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्ट