शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 20:06 IST

PM Cares फंडाला अदानींनी १०० कोटी रुपये दिल्यानंतर आता रामदेव बाबांनीही २५ कोटी रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतानाच केंद्र सरकार त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी PM Cares फंडाची घोषणा केल्यानंतर अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. PM Cares फंडाला अदानींनी १०० कोटी रुपये दिल्यानंतर आता रामदेव बाबांनीही २५ कोटी रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३५ कोटी जनतेला कोरोनाशी लढण्यासाठी केलेल्या आवाहनालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे.पतंजली समूहानंही २५ कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. रामदेव बाबा म्हणाले, पतंजली आणि रुचि सोया कंपनीचे कर्मचारीदेखील एक दिवसाचा पगार देणार आहेत. ही रक्कम जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. पतंजलीशी संबंधित ग्राहकांनाही कोरोनाविरुद्धच्या  युद्धात देशाची मदत करण्याचे आवाहनही रामदेव बाबांनी केले आहे. आपत्कालीन सेवांसाठी आमच्या पाच संस्थांतर्फे मदत करण्याची ऑफर दिली आहे. हरिद्वारचं योगाग्राम आणि पतंजली योगपीठ, मोदीनगर, गुवाहाटी, कोलकाता आणि सोलनमधले आमचे आश्रम उपचार आणि आयसोलेशनसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. या आश्रमांमध्ये जवळपास सुमारे 1500 बेड सामावू शकतात. त्याचा सर्व खर्च पतंजली समूह उचलण्यास तयार असल्याचंही रामदेव बाबांनी सांगितलं आहे.  रामदेव बाबांनी दिला योग करण्याचा सल्लाबाबा रामदेव म्हणाले की, अमेरिकेसारखे देश कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. परंतु भारताने कोरोनावर बर्‍याच प्रमाणात नियंत्रण ठेवले आहे. लॉकडाऊनचे दुष्परिणाम आहेत, ते टाळण्यासाठी लोकांनी योग केले पाहिजे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या