शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

CoronaVirus News: लॉकडाऊनचा निर्णय मोदींच्या अहंकाराचा परिणाम -राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 03:26 IST

अज्ञानापेक्षा एक बाब धोकादायक आहे ती म्हणजे अहंकार

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : देशात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे लॉकडाऊन लागू केले त्यावरून काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर टीका करीत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लॉकडाऊन लागू करण्याची पद्धत वेडेपणा असल्याचेही म्हटले होते. राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा टष्ट्वीट करीत अल्बर्ट आइन्स्टाइनचे वाक्य लिहिले आहे की, हे लॉकडाऊन सिद्ध करते की, अज्ञानापेक्षा एक बाब धोकादायक आहे ती म्हणजे अहंकार. राहुल गांधी यांचा इशारा मोदी यांच्याकडे होता.राहुल गांधी यांनी टष्ट्वीटमध्ये मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, तसा इशारा करीत स्पष्ट केले की, हा व्यंग बाण कुणावर सोडला आहे.राहुल गांधी यांनी टष्ट्वीटसोबत एक ग्राफही दिला आहे. यात दिसून येते की, जेव्हापासून लॉकडाऊन लागू केले आहे देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातून राहुल गांधी हे सिद्ध करु इच्छितात की, कोरोनावर अंकुश लावण्यासाठी लॉकडाऊन लागू केले. पण, कोरोना कमी होण्याऐवजी वेगाने वाढत आहे.अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ज्या प्रकारे व्यवहार सुरु करण्यात आले त्यानंतरही अर्थव्यवस्था घसरत आहे. याचा थेट अर्थ असा आहे की, ना माया मिळाली ना राम. राहुल गांधी आणि पक्षातील त्यांचे समर्थक भलेही हल्लाबोल करत असतील. पण, पक्षात वरिष्ठ नेत्यांचा असाही एक वर्ग आहे, जो या काळात मोदींवर टीका करण्याच्या बाजूने नाही.इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमककच्चे तेल मंदीला तोंड देत असतानाही मोदी सरकार पेट्रोलआणि डिझेलचे भाव वाढवत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. राहुल गांधी सोमवारी मोदी यांच्यावर टिष्ट्वटरवर दुसऱ्यांदा हल्ला केला.त्यांनी म्हटले की,‘लाज वाटू द्या, लुटारू सरकार.’ राहुल गांधी यांनी मनमोहनसिंग सरकार आणि मोदी सरकारमधील इंधनाच्या भावांचे तुलनात्मक आकडे देऊन सिद्ध केले की, जेव्हा कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात १०७.०९ अमेरिकन डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा मनमोहन सरकारने पेट्रोल ७१.४१ रूपये लिटर आणि डिझेल ५५.४९ रूपये प्रति लिटरच्या वर जाऊ दिले नाही.मोदी पंतप्रधान झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या भावात मंदी आली आणि प्रति बॅरल ४०.६६ अमेरिकन डॉलरवर ते आले. परंतु, बाजारात पेट्रोल विकले गेले ७६.२६ व ७४.६२ रूपये लिटर. कारण मोदी सरकारने अबकारी कर पेट्रोलवर २५८.४७ टक्के व डिझेलवर ८१९.९४ टक्के आकारला आहे, असे गांधी म्हणाले.गुजरातमध्ये पेट्रोल - डिझेल २ रुपयांनी महागगुजरात सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात २ रुपयांची वाढ केली. उपमुख्यमंत्री नितीन पटेल म्हणाले, लॉकडाऊनमुळे महसूल घटला आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे सध्या पेट्रोल ७१.८८ तर, डिझेल ७०.१२ रुपये झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी