शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Coronavirus : कर्तव्यनिष्ठा! २२ दिवसांच्या तान्हुल्या बाळासह आयुक्त जी. श्रीजना कर्तव्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 16:25 IST

Coronavirus : जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.

ठळक मुद्देजी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत.देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विशाखापट्टणम : देशात कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना करण्यात येत आहेत. 

याचबरोबर, या कोरोनाच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावत आहेत. अशाच प्रकारे विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या (GVMC) आयुक्त जी. श्रीजना कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या लहान मुलासह मैदानात उतरल्या आहेत.

जी. श्रीजना या आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर फक्त 22 दिवसांनी कार्यालयात परतल्या आहेत. जी. श्रीजना यांनी आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कर्तव्यावर परतावे लागले आहे. 

कार्यालयीन कामकाज आणि बाळाजी काळजी कशा प्रकारे घेता असा सवाल जी. श्रीजना यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, "माझे पती वकील आणि आई मला खूप मदत करतात. माझ्या मुलाला दुध पाजता यावे, यासाठी दर चार तासांनी घरी जाते आणि त्यानंतर पुन्हा कामावर परत येते. यावेळी माझे पती आणि आई बाळाची काळजी घेतात."

याचबरोबर, एक जबाबदार आणि प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी सांगितले की,  "या कठीण काळात कामावर राहाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे. या कठीण काळात आपत्कालीन सेवांची किती आवश्यकता आहे, हे सुद्धा माहीत आहे", असे जी. श्रीजना यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन विषाणूचा धोका रोखण्यासाठी संयुक्त प्रयत्न करीत आहे. तसेच, जीव्हीएमसी स्वच्छतेविषयक कामे, व्हावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. याशिवाय,  गरजूंना आवश्यक सुविधा पुरविणे. तसेच, विशाखापट्टनममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांसोबत सर्व स्तरावर समन्वय साधणे. हाच कामाचा भाग आहे, असे जी. श्रीजना यांनी सांगितले. 

दरम्यान, भारतात सुद्धा कोरोनामुळे आतापर्यंत २७३ लोकांचा मृत्यू  झाला आहे. तर ८, ३५६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३४ लोकांचा मृत्यू झाला  आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे, या आजारापासून ७१६ रुग्ण बरे झाले आहेत. 

जगभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगभरात १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. एक लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही पाच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १२ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या