शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

CoronaVirus: बेसावध राहिल्यास नवे संकट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रासह काही राज्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 06:38 IST

CoronaVirus in India:मे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता भारतात मृतांची संख्या खूपच कमी आहे. भारतातील मृत्यूदर  रशिया, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही खूप कमी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील १०० कोटींपेक्षा लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली, हे खरे असले तरी त्याबद्दल समाधान मानून चालणार नाही.  आपण बेसावध राहिलो तर भविष्यात नवे संकट उभे राहू शकेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांना तसेच सरकारी अधिकाऱ्यांना दिला. 

महाराष्ट्रासह काही राज्यांतील सुमारे ४० जिल्ह्यांत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, काही राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज बोलून दाखवली.

मोदी म्हणाले की, लसीकरण मोहिमेत आतापर्यंत सरकारी अधिकारी, कर्मचारी व आशा सेविकांमुळे प्रगती झाली आहे. दुर्गम भागातील लोकांना लस देण्यासाठी अनेकदा कर्मचारी मैलोनमैल चालत त्या गावांपर्यंत गेले आहेत. पण, आता बेसावध राहून चालणार नाही. 

कोरोनामुळे जगभरात ५० लाख लोकांचा मृत्यूवॉशिंग्टन :  कोविड-१९ च्या सर्वव्यापी साथीत गेल्या दोन वर्षांत जगभरात ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. उच्च-मध्यमवर्गीय किंवा उच्च उत्पन्न असलेल्या देशांत जगातील लोकसंख्येपैकी आठवा हिस्सा राहतो; परंतु, कोरोनामुळे जगभरात झालेल्या एकूण मृत्यूपैकी निम्म्या लोकांचा मृत्यू या देशांत झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ७४०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.जॉन हॉफकिन्स विद्यापीठाने कोरोना मृतांचा संख्या संकलित केली अहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लोच्या माहितीनुसार १९५० पासून आजपर्यंत युद्धात जवळपास एवढ्याच लोकांचा मृत्यू झाला आहे, तेवढ्या कोरोनामुळ मरण पावले. हृदयरोग आणि पक्षाघातानंतर जगभरात लोकांचा मृत्यू होण्यामागचे तिसरे मुख्य कारण कोविड-१९ आहे.

भारतात मृत्यूदर कमीमे महिन्याच्या सुरुवातीला भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठले होते. आता भारतात मृतांची संख्या खूपच कमी आहे. भारतातील मृत्यूदर  रशिया, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही खूप कमी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या