शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 11:21 IST

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 16,000 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. तसेच वेळप्रसंगी काही स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. अशीच एक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे.

एका गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर देवदूत ठरला आहे. लॉकडाऊनमुळे एक गर्भवती महिला अडकून पडली होती. त्यावेळ गुरुग्राममधील एका टॅक्सी ड्रायव्हरने महिलेला आपल्या घरी 21 दिवस राहण्यासाठी जागा दिल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर लॉकडाऊन पुन्हा वाढवला गेल्यानंतर त्याने कर्फ्यू पास तयार करून महिलेला जयपूरला तिच्या घरी सुखरुपरित्या सोडलं आहे. संजय असं टॅक्सी ड्रायव्हरचं नाव असून तो गुरुग्राममध्ये राहतो.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधून 8 महिन्यांची एक गर्भवती महिला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे गेली होती. मात्र लॉकडाऊनमुळे ती गुरुग्राममध्ये जाऊन अडकली होती. तेव्हा महिला ज्या टॅक्सीमध्ये बसली होती त्या टॅक्सी ड्रायव्हरने 21 दिवस महिलेसह तिच्या मुलीला आसरा दिला आहे. गर्भवती महिलेला आणि मुलीला पाहून परिसरात प्रश्नही विचारले जातील पण माणुसकीच्या नात्यानं त्यांना घरी घेऊन आलो असल्याची माहिती संजयने दिली. गेल्या 21 दिवसांपासून सुहाना सिंह आणि त्यांची मुलगी घरी राहिल्या. त्यांना जेवण दिलं तसेच रुग्णालयात नेल्याचं देखील सांगितलं.

'टॅक्सी ड्रायव्हरने आमची खूप मदत केली. जेव्हा पैसे संपले तेव्हा भागातील एका व्यक्तीकडे मदत मागितली. त्याने मदत केली आणि कर्फ्यू पासही करून दिला. त्यानंतर आम्हाला घरी सोडलं' असं गर्भवती महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेसाठी पोलीस देवदूत ठरले होते. दिल्लीत एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन केला. रुग्णवाहिकेच्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर उत्तर मिळालं नाही. शेवटी त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. फोन येताच तातडीने पोलीस महिलेच्या घरी दाखल झाले आणि तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केलं. महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. पोलिसांनी महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने महिला आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर

Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन

CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPregnancyप्रेग्नंसीIndiaभारतTaxiटॅक्सी