शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

coronavirus: भारतात संभाव्य औषधाच्या चाचण्या सुरू,  १० रुग्णालयांत परीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 07:43 IST

सरकारने मान्यता दिलेल्या ग्लेनमार्क कंपनीची घोषणा; जुलै-ऑगस्टपर्यंत चाचण्या होणार पूर्ण  

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने होणाऱ्या ‘कोविड-१९’ या महाभयंकर आजारावर कदाचित गुणकारी ठरू शकणाºया ‘फॅविपिरावीर’ या औषधाच्या प्रत्यक्ष रुग्णांवरील चाचण्या मंगळवारपासून सुरू करण्यात आल्याचे ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध उत्पादक कंपनीनेजाहीर केले.मुंबईतील ग्लेनमार्क कंपनीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी या औषधाच्या ‘कोविड-१९’च्या बाधित रुग्णांवर चाचण्या घेण्याची मान्यता एप्रिलमध्ये दिली. सरकारकडून अशी मान्यता मिळालेली देशातील ही एकमेव औषध कंपनी आहे.‘फॅविपिरावीर’ हे मूळ औषधीद्रव्य वापरून ‘अ‍ॅव्हीगान’ या ब्रँडनेमचे औषध जपानमधील फुजीफिल्म तोयामा केमिकल कंपनी तयार करते. भारतात ते औषध तापावर वापरण्यास २०१४ पासून परवानगी मिळालेली आहे. या औषधाचा बाधितांना देण्यासाठीचा योग्य डोस ग्लेनमार्क कंपनीने तयार केला आहे. या चाचण्या जुलै किंवा आॅगस्टपर्यंत पूर्ण होतील. त्यांच्या निष्कर्षांचा बारकाईने अभ्यास केल्यावर हे औषध कोरोनावर कितपत गुणकारी ठरते, हे स्पष्ट होईल. ग्लेनमार्क कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जेथे कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशा १० सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये या औषधाच्या प्रत्यक्ष रुग्णांवर चाचण्या घेण्यात येतील.प्रभावी लस लवकरच; जागतिक आरोग्य संघटनेला विश्वासच्वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अवघे जगच संकटात सापडले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सगळे देश धडपडत आहेत. आरोग्य यंत्रणांसमोर मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. ‘या विषाणूवर मात करू शकेल, अशी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अपेक्षित वेळेआधीच ती उपलब्ध होऊ शकेल. संशोधकांचे ७ ते ८ गट अशी लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.च्लवकरच जगाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. असे घडले तर संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस अ‍ॅडनॉम यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला दिली. या कामासाठी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला. आज संशोधकांचे वेगवेगळे सुमारे १०० गट या लशीच्या चाचण्या करीत आहेत. यातील काही गट अशी लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतmedicinesऔषधं