शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 14:33 IST

ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे.

नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटानं देशासमोर मोठी समस्या निर्माण केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व ग्रामपंचायतीच्या प्रमुखांना संबोधित केले. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई-गाव स्वराज पोर्टल आणि अ‍ॅप लाँच केले. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न, त्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वामित्व योजनेचीही घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी गावकऱ्यांनी जगाला मोठा संदेश दिला आहे. ग्रामस्थांनी 'दोन यार्ड' म्हणजेच ६ फुटांचं अंतर राखावं, असं आवाहनही मोदींनी गावकऱ्यांना केलं आहे.पंतप्रधान मोदींनी स्वामित्व योजना केली सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मोदींनी स्वामित्व योजनेचीदेखील सुरुवात करत असल्याची त्यांना माहिती दिली. 5 ते 6 वर्षांपूर्वी देशातील फक्त १०० पंचायती ब्रॉडबँडने जोडल्या गेल्या होत्या, परंतु आज ही सुविधा सव्वा लाख पंचायतींपर्यंत पोहोचली आहे. तसेच मालमत्तेचं स्वामित्व असल्यानं बँकेकडून कर्ज घेता येणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटकसह ६ राज्यांत ही योजना सुरू केली जात आहे. त्यानंतर या योजनेत सुधारणा करून ती संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. कोरोनासंदर्भात गावांनी जी खबरदारी घेतलेली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येकानं ’दोन यार्डाचे अंतर’ पाळण्याचं आवाहनही पंतप्रधान मोदींनी पंचायत सदस्यांशी चर्चा करताना केलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या