नवी दिल्ली: कोरोनाच्या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मोदींनी या पॅकेजला स्वावलंबी भारत असं नाव दिलं. स्वावलंबी भारत पॅकेजमध्ये देशातल्या, अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्यात आला असल्याचं मोदींनी सांगितलं. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. संपूर्ण जगानं अशी परिस्थिती पाहिलेली नाही. मात्र या संकटाचा वापर आपण संधी म्हणून करायला हवा, असं मोदी म्हणाले. कोरोना आधीचं जग आणि नंतरच जग याचा विचार केल्यास भारताला खूप मोठी संधी असल्याचं मोदींनी सांगितलं. आपण या कठीण काळावर मात करू. संकटातून मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.२१ व्या शतक भारताचं असेल असं म्हटलं जात होतं. आता आपल्याकडे तशी संधी आहे. आपण अधिकाधिक स्वावलंबी व्हायला हवं. आपल्या स्वावलंबाचा फायदा जगाला होईल. कारण आपलं स्वावलंबन म्हणजे आत्मकेंद्रीपणा नसेल, असं मोदी म्हणाले. आपण संकटातून नक्की बाहेर पडू, असं सांगताना मोदींनी २१ व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या दोन संकटांचा उल्लेख केला.'२१ व्या शतकाची सुरुवात झाली. त्यावेळी Y2K संकट आलं. ते संकट त्यावेळी अभूतपूर्व होतं. मात्र आपल्या तंत्रज्ञांनी त्यातून मार्ग काढला. कारण आपल्याकडे उत्तम गुणवत्ता होती आणि आजही आहे. २००१ मध्ये कच्छमध्ये भूकंप झाला. तो भूकंप आम्ही पाहिला. सगळीकडे ढिगारे होते. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. सगळंच संपलं असं वाटत होतं. परिस्थिती बदलेल असं वाटलंही नव्हतं. पण कच्छ उठून उभा राहिला. तो पुढे चालू लागला. त्यामुळे आपण निश्चय केला, तर कोणताही मार्ग अवघड नाही. देश नक्कीच स्वावलंबी होऊ शकतो,' असं मोदी म्हणाले. ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्रीस्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणापंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा
CoronaVirus News: तेव्हा वाटलं होतं सगळंच संपलं; मोदींनी सांगितला १९ वर्षांपूर्वीचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:41 IST