शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:47 IST

CoronaVirus news: कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर

नवी दिल्ली: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात येईल. मात्र या पॅकेजमध्ये देशातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही असेल, असं मोदी म्हणाले. सध्या जग अनुभवत असलेलं संकट अभूतपूर्व आहे. मात्र भारत याच संकटाचा वापर संधी म्हणून करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.स्वावलंबी भारत घडवण्याची पंचसुत्री पंतप्रधान मोदींनी सांगितली. स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. 'स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही असायला हवी. लोकसंख्याशास्त्र आपलं सामर्थ्य आहे. तिचा पुरेपूर वापर करायला हवा. भारतीय बाजारातील मागणी हीदेखील आपली जमेची बाजू आहे. मागणी आणि पुरवठा साखळीतले सगळे घटक सशक्त करायला हवेत. त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्याची गरज आहे,' असं मोदी म्हणाले.कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत केलेल्या आर्थिक घोषणा, रिझर्व्ह बँकेनं घेतलेले निर्णय आणि आता सरकारनं घोषित केलेलं स्वावलंबी भारत पॅकेज यांची बेरीज करता ते २० लाख कोटींचं असल्याचं मोदींनी सांगितलं. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के रकमेचं पॅकेज सरकार जाहीर करत असल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेश पॅकेज तयार करण्यात आलं असून त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला दिलासा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी बोलून दाखवला.स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणापंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी