शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आधी टाळ्या, थाळ्या, मग पणती, मेणबत्ती; आज कोणता नवा टास्क देणार पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:33 IST

पंतप्रधान मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. लवकरच संपणारा लॉकडाऊन आणि देशातील कोरोनाबाधितांची संख्या या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज मोदी काय नेमकं काय बोलणार, असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. कालच मोदींनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तब्बल सहा तास चर्चा केली होती. त्यात काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती.याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. मोदींनी कोरोनाबद्दल देशवासीयांना सर्वप्रथम संबोधित करताना जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मोदींनी देशातल्या कोरोना योद्ध्यांसाठी पणती, मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आज पंतप्रधान देशवासीयांना काय सांगणार, कोणतं नवं आवाहन करणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटत आहे. देशातल्या कोरोना योद्ध्यांना सलाम करण्यासाठी मोदी नवं आवाहन करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदी कोरोना विरोधातल्या लढ्यात योगदान देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतात. याआधी मोदींनी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. 'टाळ्या, थाळ्या, पणती, मेणबत्ती या सगळ्यांनी भावनांना जन्म दिला असून त्यामुळेच प्रत्येक नागरिकानं काही ना काही करण्याचा निश्चय केला आहे. प्रत्येकाला यातून प्रेरणा मिळाली आहे,' असं मोदींनी म्हटलं होतं. देशातली जनता कोरोना विरुद्धची लढाई लढतेय. जनतेच्या सोबतीनं शासन, प्रशासन लढतंय. देशातला प्रत्येक नागरिक कोरोना विरुद्धच्या लढाईतला सैनिक असून तोच या लढ्याचं नेतृत्त्व करत असल्याचंही मोदींनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासीयांशी संवाद साधणार; मोठी घोषणा होणार?देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी