शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

By बाळकृष्ण परब | Updated: November 11, 2020 16:15 IST

Pfizer Vaccine News : फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहेत्यामुळे ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणे खूप कठीण दिसत आहे

नवी दिल्ली - फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार फायझरच्या या लसीची किंमत खूप जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणे खूप कठीण दिसत आहे.फायझर आणि बायोनटेकच्या लसीच्या यशस्वीतेबाबत खूप अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते फायझरची लस ही कोरोनाविषाणूविरोधात यश मिळवणारी पहिली लस ठरेल. फायझरने आपल्या या लसीची किंमत ही ३९. डॉलर ( प्रत्येक डोसासाठी १९.५ रुपये) एवढी ठेवली आहे. तर mRNA लसीवर काम करत असलेल्या मॉडर्नाने लसीची किंमत ही ३७ डॉलर एवढी ठेवली आहे. आता या लसीची भारतात किती किंमत असेल याची माहिती घेण्यात येत आहे.युरोपिय महासंघ, जपान, अमेरिका आणि ब्रिटन यांनी फायझरसोबत कोरोनावरील लसीसाठी करार केला आहे. या करारांतर्गत त्यांना २०२१ पर्यंत १.३ बिलीयन लसी मिळण्याची शक्यता आहे. तर भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि सरकारने फायझरसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही.तसेच डब्ल्यूएचओची लस विकसित करत असलेल्या COVAX  सोबतही कुठलाही करार करण्यात आसलाना नाही. खरेदीपेक्षा फायझरच्या अल्ट्रा कोल्ड व्हॅक्सिनसाठी सर्वात मोठं आव्हान साठवण असेल. फायझरच्या mRNA लसीला उणे ७० ते उणे ८० डिग्री तापमानामध्ये वाहतूक करून नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारण फ्रीजमध्ये ही लस २४ ते ४८ तासांत खराब होऊ शकते.फायझरची लस ही भारतातील उष्ण वातावरणात फारशी उपयुक्त असेल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत विकसित देशांना अल्ट्रा कोल्ड चेनच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असेल. सध्या भारताकडे सुमारे २७ हजार कोल्ड चेन पॉईंट्स आहेत. हे २ ते आठ डिग्रीपर्यंत प्रशितन पुरवतात. काही कोल्ड चेन इफ्रास्ट्रक्चर विशिष्ट्य औषधांसाठी उणे ३० डिग्रीपर्यंत काम करतात. एकूण कोल्ड चेन इफ्रापैकी ९० टक्के कृषीमाल साठलवण आणि केवळ १० टक्के औषधांच्या आवश्यकतेसाठी वापरले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतmedicinesऔषधं