शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोना संशयित महिलेच्या अंत्यसंस्कारांवरून लोक भडकले, पोलिसांवर दगड फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 13:07 IST

कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोबतच लोकांमध्ये अनेक समज गैरसमज पसरत आहेत. त्यातून काही गंभीर प्रश्न उदभवत आहेत.

ठळक मुद्देलोकांनी संबंधित महिलेचे अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत अंत्यसंस्कारास विरोध केलात्यांनी डॉक्टर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसेच अँब्युलन्सचेही नुकसान केलेपोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले

अंबाला (हरियाणा) - देशात वेगाने होत असलेल्या कोरोनाच्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोबतच लोकांमध्ये अनेक समज गैरसमज पसरत आहेत. त्यातून काही गंभीर प्रश्न उदभवत आहेत. दरम्यान, हरियाणामधील अंबाला येथील चांदपुरा गावात एका कोरोना संशयित महिलेच्या अंत्यसंस्कारावरून मोठा गोंधळ झाला. लॉकडाऊनचे उल्लंघन करत लोकांनी संबंधित महिलेचे अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी धाव घेत अंत्यसंस्कारास विरोध केला. अखेरीस पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. त्यानंतर या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल अद्याप आला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 'या महिलेला दम्याचा त्रास होता. सोमवारी दुपारपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिची कोरोना चाचणी करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेचे पालन करून नमुने घेण्यात आले असून, त्यानंतर तिचा मृतदेह जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला,' असे सिव्हिल सर्जन कुलदीप सिंह यांनी सांगितले. मात्र गावकऱ्यांनी विनाकारण अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला, असेही सिंह यांनी सांगितले. 

याबाबत अंबाला कॉन्टोनमेंटचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, सर्व खबरदारी घेऊन अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे आम्ही गावकऱ्यांना सांगितले. मात्र ते ऐकून घेण्याच्या  मनस्थितीत नव्हते. त्यांनी डॉक्टर आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तसेच अँब्युलन्सचेही नुकसान केले. अखेरीस जमावाला पांगवण्यासाठी आम्हाला बळाचा वापर करावा लागला. आता डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राम कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणा