शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ऐंशी वर्षाच्या आजी-आजोबांचा कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात, दोन लाख केले दान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 11:57 IST

भागीरथ आजोबांनी शेवटच्या क्षणी आर्थिक मदतीसाठी कोणाजवळ हात पसरवण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी दोन लाख रूपये पत्नीच्या नावे जमा केले होते.

जन्माला आलोय तसेच एक ना एक दिवस आपल्यालाही जायचे आहे. या धरतीवर आपण पाहुणेच आहोत. कोरोनाने जशी सगळीकडे नकारात्मकता पसरवली. तसेच सकारात्मक दृष्टीकोनही निर्माण केले आहेत. आयुष्याची संध्याकाळ केव्हा होईल हे माहित नाही. जे आपले नाहीच, त्याबद्दल कसला गर्व बाळगायचा त्यामुळे कुठेतरी आपणही समाजाचे देणे लागतो असे म्हणत आजी-आजोबांनी पीएम केयर फंडमध्ये जवळपास एक लाख रूपये मदतीसाठी दिले आहेत.तसेच मुख्यमंत्री मदत निधीतही त्यांनी एक लाख रूपये दिले आहेत. अशाप्रकारे दोन लाखांची मदत त्यांनी केली आहे.

मूळ बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील हिराजी खेड्यातील भगीरथ मिश्रा पत्नी पुष्पा मिश्रासह राहतात. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांचा घरखर्च भागतो. ऐंशी वर्षांचे भगीरथ मिश्रा प्रयागराजमध्ये अधीक्षकपदी कार्यालयातून निवृत्त झाले आहेत. त्यांना मुलं नाहीत. दोघेच पती -पत्नी एकमेकांची काळजी घेतात. एक दिवशी वृत्तपत्रात कोणी कशी कोरोनासाठी मदत केली. यासंदर्भातील बातमी मिश्रा वाचत होते. त्याचवेळी एका लहानग्या मुलाने कोरोनाच्या युद्धासाठी त्याची पिगी बँकेत जमा झालेली रक्कम पीएम केअर फंडला दिल्याची बातमी त्यांनी वाचली. 438 रुपये या चिमुकल्याने दिले होते. ही बातमी वाचून त्यांनीही पीएम केअर्समध्ये मदत जमा करण्याचा निर्धार केला. भागीरथ आजोबांनी शेवटच्या क्षणी आर्थिक मदतीसाठी कोणाजवळ हात पसरवण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी दोन लाख रूपये पत्नीच्या नावे जमा केले होते. भविष्याचा विचार न करता आजोबांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजीच दान केली.

जनकल्याणासाठी दोन लाख रुपये दिल्याने त्यांना मोठा समाधान मिळाल्याचे वृद्ध दाम्पत्य सांगतात. आजपर्यंत आजी-आजोबांना मदत देण्यात आल्याच्या घटना आपण पाहिल्यात. मात्र आजी -आजोबांनीच पुढाकार घेत मदत केल्याची ही बातमी इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या