शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: आश्चर्य! देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या’ राज्यात आज फक्त १ कोरोना रुग्ण आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 23:05 IST

केरळ हे असे राज्य आहे ज्याठिकाणी देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता

ठळक मुद्देकोरोनाविरूद्धच्या युद्धात केरळने इतके मोठे यश कसे मिळवले? कासारगोड, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित केरळ राज्यातील जिल्हा आहेबर्‍याच काळ केरळ कोरोना रुग्णांच्या यादीत देशात अव्वल स्थानावर होता

कोची – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या लढाईत केरळमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. बुधवारी या दक्षिणेकडील केरळ राज्यात फक्त एक कोरोनाचा रुग्ण आढळला. ही माहिती देताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, आता राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या ३८७ झाली आहे, त्यापैकी केवळ १६७ लोकांवर उपचार सुरु आहेत. बाकीच्या रुग्णांची तब्येत ठीक आहे.

केरळ हे असे राज्य आहे ज्याठिकाणी देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ३० जानेवारी रोजी देशातील पहिला कोविड -19 रुग्ण केरळच्या त्रिसूरमध्ये आढळला. त्यानंतर राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली. बर्‍याच काळ केरळ कोरोना रुग्णांच्या यादीत देशात अव्वल स्थानावर होता परंतु आज या यादीमध्ये तो दहाव्या स्थानावर घसरला आहे. ही यादी अशी आहे ज्यामध्ये कोणत्याही राज्याला प्रथम येण्याची इच्छा नाही. परंतु दुर्दैवाने संक्रमणाच्या २ हजार ९१६ रुग्णांमुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

बिकट परिस्थितीतून वेगात सावरलेला केरळ बनला आदर्श

कोरोनाविरूद्धच्या युद्धात केरळने इतके मोठे यश कसे मिळवले? हा नैसर्गिक प्रश्न आहे. खरं तर, देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या केरळमध्ये राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाची नेमकी रणनीती अन् त्यानुसार ठोस कारवाई करून केवळ ढासळणारी परिस्थितीच वेगाने सांभाळली नाही तर इतर राज्यांसाठीही एक उदाहरण म्हणून समोर आलं आहे.

कासारगोड, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित केरळ राज्यातील जिल्हा आहे. केरळमधील कोरोना हॉटस्पॉट म्हणून कासारगोड उदयास आला जिथे आतापर्यंत १३५ हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तेथील परिस्थिती वेगाने खालावत होती, जेव्हा मुख्यमंत्री विजयन यांनी आयपीएस अधिकारी विजय सखारे यांना कासारगोडचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले. साखरे यांनी जिल्ह्यातील विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी रणनीती बनविली आणि त्यावर काम केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ