शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशातील सर्वात लहान योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून कोरोनावर मात, डॉक्टर म्हणाले चमत्कारच! पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 12:39 IST

ओडिशामध्ये कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीने चमत्कारच केल्याचं म्हटलं जात आहे.

ठळक मुद्देही चिमुकली कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली आहे.ही नवजात चिमुकली दोन आठवड्यापूर्वी कोरोना संक्रमित झाली होती. आता मुलगी पूर्णपणे बरी आहे. लवकरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले जाईल

भूवनेश्वर – कोरोनाची दुसरी लाट भयानक असून वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे अनेकांच्या मनात दहशतीचं वातावरण आहे. या दुसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक संक्रमित होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळात आपण अनेक घटना पाहिल्या असतील जिथं इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. मग ते शंभरी पार केलेले आजोबा असो वा नुकतेच जन्मलेले बाळ असो. संघर्षातून अनेकांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकलेली आहे.

ओडिशामध्ये कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीने चमत्कारच केल्याचं म्हटलं जात आहे. भूवनेश्वरच्या एका हॉस्पिटलमध्ये या नवजात मुलीवर कोरोनाचे उपचार सुरू होते. १० दिवसात या चिमुकलीने कोरोनावर मात दिली आहे. लहान मुलगी मागील १० दिवसांपासून व्हेटिंलेटर होती. माहितीनुसार, ही चिमुकली कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली आहे.

ही नवजात चिमुकली दोन आठवड्यापूर्वी कोरोना संक्रमित झाली होती. त्यानंतर मुलीला कालाहांडीहून भूवनेश्वर येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं. याठिकाणी खासगी दवाखान्यात या नवजात चिमुकलीला ICU व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. १० दिवस ही व्हेंटिलेटरवरच होती. डॉ. अरिजीत महापात्रा म्हणाले की, या मुलीवर रेमडेसिवीर, स्टेरयेड आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. २ आठवडे तिच्यावर उपचार करण्यात आले. आता मुलगी पूर्णपणे बरी आहे. लवकरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले जाईल. हे चमत्कारापेक्षा कमी नाही असं डॉक्टर म्हणाले.

ओडिशा येथे कोरोनाचे १२,३९० संक्रमित

ओडिशा राज्यात एका दिवसात तब्बल १२ हजार ३९० कोरोना संक्रमित आढळले. राज्यात आतापर्यंत संक्रमणाची संख्या ५ लाख ८८ हजार ६८७ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी २२ जणांच्या मृत्यूनंतर आतापर्यत या महामारीने एकूण २ हजार २७३ जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. ओडिशामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार १६ इतकी आहे. आतापर्यंत ४ लाख ८२ हजार ३४५  रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ओडिशामध्ये एका दिवसात ५६ हजार २१४ नमुने तपासले आहेत. जे एका दिवसात सर्वाधिक आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल