शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशात झाले एक लाख मृत्यू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 18:38 IST

Coronavirus In Madhya Pradesh: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे.

भोपाळ - कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आता देशातील विविध राज्यांमधून ओसरू लागली आहे. (Coronavirus In Madhya Pradesh) मात्र आता कोरोनावरून राजकारणाला जोर आला असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे. दरम्यान, कमलनाथ यांच्या या आरोपानंतर मध्य प्रदेशमधील राजकारण तापले आहे. . ( One lakh deaths in Madhya Pradesh in two months, serious allegations by former chief minister Kamal Nath)राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. त्यानंतर कमलनाथ यांनी राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवण्यात येत असल्याचा तसेच राज्यात एक लाखाहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

कमलनाथ म्हणाले की, सरकारकडून सांगण्यात येत असलेले आकडे खोटे आहेत. हे आकडे केवळ राज्यालाच नाही तर जगाला फसवण्यासाठी सांगण्यात येत आहे. जेवढे मृतदेह स्मशानात आणि कब्रस्थानात आले त्यामध्ये ८० टक्के मृत्यू हे कोरोनामुळे झालेले मृत्य आहेत असे मानले पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिका हे कोरोनामुळे झालेले मृत्यू नाहीत, असे म्हणताहेत. मात्र ते कुणाला मुर्ख बनवत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार ३० मार्च ते २० मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये १६७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र कमलनाथ यांचा आरोप आहे की, मार्च ते एप्रिल या काळात स्मशान आणि कब्रस्थानामध्ये आलेल्या एकूण १ लाख २७ हजार ५३० मृतदेहांपैकी १ लाख २ हजार २ मृतदेहांवर कोविड प्रोटोकॉलअंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

दरम्यान, कमलनाथ यांना राज्य सरकारने प्रत्युत्तर दिले असून, जर राज्यामध्ये १ लाखांहून अधिक मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचा पुरावा कमलनाथ यांनी दिला तर मी त्वरित राजीनामा देईन, असे प्रतिआव्हान मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहे. दरम्यान, कमलनाथ यांना मृतदेह मोजण्याची सवय आहे, १९८४ ची दंगल सर्वांना माहिती आहे, असा टोलाही मिश्रा यांनी लगावला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारण