शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओला, उबर कंपन्यांचा मोठा निर्णय, लोकप्रिय पर्याय स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:53 IST

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका ओला, उबर कंपन्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे. जे लोक ओलाच्या शेअर आणि उबरच्या पूल सर्व्हिसचा वापर करत होते, त्यांना आता त्या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक देशांना या कोरोना व्हायरसनं विळख्यात घेतलं आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम हा देशातल्या मोठ्या सेक्टरवर झालेला आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका ओला, उबर कंपन्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी शेअरिंग राइड ही सुविधा थांबवली आहे. म्हणजेच जे लोक ओलाच्या शेअर आणि उबरच्या पूल सर्व्हिसचा वापर करत होते, त्यांना आता त्या सुविधेचा लाभ मिळणार नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ओला-उबरनं घेतला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओला शेअर सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कंपनीच्या मायक्रो, मिनी, प्राइम, रेंटल आणि आउटस्टेशनसारख्या सुविधा सुरूच राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया ओलानं दिली आहे. तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या शहरांत आम्ही सेवा देतो, त्या शहरांमधील उबर पूलची सेवा थांबवण्यात आलेली आहे, अशीही माहिती उबरनं दिली आहे. काय खास आहे या सुविधांमध्ये?ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांच्या शेअर आणि पूल सेवेंतर्गत रस्त्यावरील प्रवाशांना एकत्र प्रवास करण्याची सुविधा मिळते. या सुविधेत किंमत फारच कमी असते. त्यामुळे मेट्रो शहरात या सुविधांना अधिक मागणी आहे. 

लांब पल्ल्याच्या 4000 गाड्या रद्दपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जनता कर्फ्यू’च्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी मुंबईत मोजक्याच लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा तपशील शनिवारी जाहीर केला जाईल. त्याचवेळी देशभरातील रेल्वेच्या 4000 गाड्या बंद राहणार आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी मुंबईत लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच मेगाब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेºया रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल. आयआरसीटीसीनेही फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जनआहार, सेल किचन या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : जगभरात कोरोना अलर्ट! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

‘...मग कोरोना व्हायरस गिळून ढेकर दिली असती की ईडीमागे लावून बोलती बंद केली असती?’

MP Crisis: ‘हे’ ट्विट सांभाळून ठेवा! सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या या दाव्याने पुन्हा खळबळ

Coronavirus : कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

टॅग्स :OlaओलाUberउबर