शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अरे बापरे! आता ओमायक्रॉनचा भाऊही सापडला, डेल्मिक्रॉन असं झालं नामकरण, किती आहे धोकादायक, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 15:01 IST

Coronavirus: Omicronने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे Delimcronची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूने गेल्या दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घातले आहे. कोरोनाचा एक व्हेरिएंट गेला की काही काळातच नवा व्हेरिएंट समोर येत आहे. वुहानमधील कोरोनाच्या पहिल्या व्हेरिएंटमुळे पहिली लाट आली होती. तर डेल्टाने संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण केली होती. दरम्यान, आता ओमायक्रॉनने जगाला भीती दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचा एक भाऊही समोर आला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये परिस्थिती बिघडत आहे. तसेच तिथे डेल्मिक्रॉनची लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. तसेच भारतामध्येही आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा हळुहळू वाढू लागले आहेत.

तज्ज्ञांना दिसत असलेला ओमायक्रॉनचा भाऊ अन्य कुणी नाही तर डेल्टा आणि ओमायक्रॉनचे मिळतेजुळते रूप आहे. त्याला डेल्मिक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. यावेळी जगभरात दोन्हीही व्हेरिएंट मिळत आहेत. भारतामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २२० च्या पुढे गेली आहे. दरम्यान, या व्हेरिएंटचा वाढला फैलाव पाहता बुस्टर डोसची मागणी होत आहे. अनेक देशांमध्ये बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टा आणि ओमायक्रॉन म्हणजेच डेल्मिक्रॉन किती भयानक रूप धारण करेल, याबाबत काही स्पष्ट सांगता येणार नाही.

काही तज्ज्ञांच्या मते देशातील सध्याच्या कोरोना रुग्णवाढ ही डेल्मिक्रॉनची लाट आहे. महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्समधील सदस्य शशांक जोशी यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपमध्ये डेल्मिक्रॉन (डेल्टा आणि ओमायक्रॉन स्पाईक) मुळे रुग्णांची छोटी लाट येत आहे.  त्यांनी सांगितले की, भारतात ओमायक्रॉनचा किती आणि कसा प्रभाव पडेल हे पाहणे अद्याप बाकी आहे.  भारतामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव हा खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. सध्या देशामध्ये डेल्टाही उपस्थित आहे. जगातील इतर भागात डेल्टाची जागा आता ओमायक्रॉन घेत चालला आहे. मात्र डेल्टा डेरिवेटिव्स आणि ओमायक्रॉनचा काय परिणाम होईल, याचा अंदाज आतातरी व्यक्त करत येणार नाही.

भारतामध्ये सध्या हायब्रिड इम्युनिटी उपस्थित आहे. जोशी यांनी सांगितले की, मुंबई आणि दिल्लीमध्ये झालेल्या सीरो सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ९०  टक्के लोकसंख्येला कोरोना झाला होता. त्यांनी सांगितले की ८८ टक्के भारतीय नागरिकांनी कोरोनाविरोधातील लसीची किमान एक डोस घेतला आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि तज्ज्ञांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच लोकांना मास्क वापरण्याचे आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनHealthआरोग्य