शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

coronavirus: राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी शाही लिची घेऊन बिहारमधून आलेला अधिकारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 16:34 IST

बिहारमधून दिल्लीतील बिहार भवनमध्ये शाही लिची घेऊन आलेला मुझफ्फरपूरच्या कृषी विभागातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही शाही लिची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना भेट म्हणून पाठवण्यात आली होती.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा देशात सर्वत्र झालेला संसर्ग आणि त्याचा वाढता फैलाव हा आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढवत आहे. दरम्यान,  बिहारमधूनदिल्लीतीलबिहार भवनमध्ये शाही लिची घेऊन आलेला मुझफ्फरपूरच्या कृषी विभागातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही शाही लिची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना भेट म्हणून पाठवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ दिल्लीत लिची पोहोचली की नाही हे पाहण्याची होती. लिचीचे वितरण त्यांनी केलेले नाही, असे मुझफ्फरपूरच्या जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे. 

यासंदर्भात मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर प्रसाद सिंह यांनी सांगितले की, हे अधिकारी केवळ लिची नेणारा ट्रक दिल्लीत बिहर भवन येथे पोहोचला की नाही याची पडताळणी करण्यासाठी दिल्लीत गेले होते. हे काम काम आटोपल्यावर ते आपल्या दोन नातेवाईकांना भेटले. नंतर त्यापैकी एक नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्या आधारावर अधिकाऱ्यांने स्वतःची स्वतःची चाचणी करवून घेतली. ती पॉझिटिव्ह आली. मात्र लिचीच्या वितरणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ते काम बिहार भवनमधील अधिकारीच करतात. 

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आलेले अधिकारीच लिचीचे वितरण करण्यासाठी गेले होते, अशा आशयाच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र हे वृत्त प्रशासनाकडून फेटाळून लावण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी दिल्लीतून परतलेल्या या अधिकाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र हे अधिकारी विमानाने परत आले होते. त्यामुळे आता बिहार सरकार कॉन्टँक्ट ट्रेसिंग करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.  देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना बिहारमध्ये स्थलांतरित मजुरांसोबत कोरोना विषाणूसुद्धा पोहोचला असून, राज्यातील एकूण ७ हजार ३८० कोरोना रुग्णांपैकी ४ हजार ८४४ रुग्ण हे स्थलांतरित मजूर आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीBiharबिहारRamnath Kovindरामनाथ कोविंदNarendra Modiनरेंद्र मोदी