शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : १५ दिवसांपासून घरीच गेली नाही 'नर्स', मुलीला दूरुनच पाहिलं अन् दाटला आईचा कंठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 18:42 IST

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी फोन करुन संबंधित नर्ससोबत संवाद साधला.

बंगळुरू - कोरोनाविरुद्धच्या लढाईत माणूसकीचे दर्शन अनेकदा घडले आहे, तर कित्येक भावूक क्षणही डोळ्यात साठले जात आहेत. कर्नाटकमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच भावूक केलं आहे. आपल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या चिमुकलीचा रडतानाचा हा  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या आईला दूरुनच पाहून ही चिमुकली रडताना दिसत आहे. या मुलीचा आई परिचारिका म्हणजे नर्स असून कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सध्या आपल्या कामात व्यस्त आहे. त्यातच, गेल्या १५ दिवसांपासून या नर्स आपल्या घरीसुद्धा गेल्या नाहीत. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी फोन करुन संबंधित नर्ससोबत संवाद साधला. तसेच, या नर्सच्या कामाचं आणि कामाप्रति दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं. कर्नाटकच्या बेलागवी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेजच्या कोविड १९ वार्डमध्ये गेल्या १५ दिवसांपासून ही नर्स काम करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत आपल्या ३ वर्षीय मुलीलाही त्यांचं भेटणं झालं नाही. सुगंधा असे या कर्तव्यदक्ष नर्सचे नाव आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत चिमुकली आपल्या वडिलांसमवेत दुचाकी वाहनावर आईला भेटण्यासाठी आल्याचं दिसत आहे. रुग्णालयात असलेल्या आईला हात दाखवून ती चिमुकली आपल्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा काढत आहे. तर आपल्या तीन वर्षीय लहानशा मुलीला पाहून आईही भावुक झाल्याचे दिसत आहे, पण कोरोनाच्या प्रादुर्भाच्या भीतीने आई आपल्या मुलीलाही जवळ जाऊन भेटू शकत नाही. हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असून कर्नाटक भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी फोनवरुन संबंधित नर्सशी संवाद साधत कामाचे कौतुक केले. तसेच, पत्र लिहूनही देत असलेल्या योगदानाबद्दल विशेष स्तुती केली. दरम्यान, एका कार्यक्रमावेळी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुविधेबद्दल येडीयुरप्पा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, बोलताना आम्ही या सर्वांची काळजी घेत आहोत, तसेच या सर्वांप्रति सरकारची प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, सध्या देशात कोडिव १९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र वैद्यकीय क्षेत्र, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी रात्रंदिवस काम करताना दिसत आहे. आपल्या कामामुळे अनेकदा त्यांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, घरी जाऊनही घरच्यांना जवळ घेता येत नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे कोरोना वॉरियर्स मोठं योगदान देत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकYeddyurappaयेडियुरप्पाdoctorडॉक्टर