शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सुखद बातमी! रुग्णसंख्या घटतेय; कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणारे अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 07:43 IST

शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळले तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला होता

ठळक मुद्देपंतप्रधान मदतनिधीतून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरयाणासहित अनेक राज्यांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष होते.सदोष व्हेंटिलेटर वापरल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होताशुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळले तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली असून, मृतांचा आकडाही कमी झाला आहे. शनिवारी कोरोनाचे ३ लाख २६ हजार नवे रुग्ण आढळले व  ३,८९० जण मरण पावले. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ४३ लाखांहून अधिक असून, त्यातील २ कोटी ४ लाख लोक बरे झाले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.८३ टक्के आहे.

शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळले तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, देशात २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ कोरोना रुग्ण असून, त्यातील २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८ जण बरे झाले. शनिवारी ३ लाख २६ हजार ९८ नवे रुग्ण आढळले तर ३ लाख ५३ हजार २९९ बरे झाले. सध्या ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

राज्यांनी खरीखुरी आकडेवारी सादर करावीसर्व राज्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता व अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्यांच्याकडील कोरोना रुग्णांची तसेच या संसर्गाने मरण पावलेल्यांची खरीखुरी आकडेवारी सादर करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या काही राज्ये लपवत असल्याची टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे उद्गार काढले. देशातील कोरोना स्थितीचा मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. 

पंतप्रधान मदतनिधीतून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरयाणासहित अनेक राज्यांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष होते. त्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले. सदोष व्हेंटिलेटर वापरल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. जगभरात कोरोनाचे १६ कोटी २५ लाख ५५ हजार रुग्ण असून, त्यातील १४ कोटी ४ लाख ५१ हजार रुग्ण बरे झाले, तर ३३ लाख ७१ हजार जणांचा आजवर कोरोनाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या