शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
गडचिरोलीत आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
3
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
4
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
5
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
6
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
7
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
8
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
9
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
10
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
11
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
12
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
13
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
15
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
16
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
17
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
18
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
19
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
20
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:09 IST

coronavirus : भारतात १३ बळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे बुधवारी भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली असून, बळींची एकूण संख्या १९,२४६ इतकी झाली आहे.जगभरातील १८१ देशातील ही संख्या आहे. यामध्ये युरोपमधील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २,२६,३४० पेक्षा अधिक तर बळींची संख्या १२,७१९ इतकी आहे. आशियात ९९,८०५ रुग्ण आहेत तर ३,५९३ बळी गेले आहेत. जगातील आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, सध्या युरोप हा कोरोना साथीचे केंद्र बनला असला, तरी अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्यता आहे.भारतात १३ बळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे बुधवारी भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. यामुळे देशातील एकूण बळींची संख्या १३ वर गेली आहे, तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६०६ झाली आहे.बुधवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील एका ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर राज्यात कोरोना संसर्गाचे आणखी सहा रुग्ण आढळले. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १५ झाली आहे. यामध्ये भोपाळ येथील एका पत्रकाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा पत्रकार २० मार्च रोजी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीस उपस्थित होता. तसेच त्यानंतर तो राज्य विधानसभेतही उपस्थित होते. यामुळे खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका ८५ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. कोरोनाचा राज्यातील हा दुसरा बळी आहे. या महिलेने परदेश प्रवास केला होता.पाकिस्तानमध्ये १००० जणांना संसर्गइस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या १०००च्या वर गेली आहे. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा दोन एप्रिलपर्यंत थांबविण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कोविड-१९मुळे संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या १,०३७ झाली आहे. त्यामध्ये सिंधप्रांतात ४१३, बलुचिस्तानमध्ये ८०, इस्लामाबादमध्ये १५ आणि पाकिस्तानातील काश्मीरमध्ये एकजण संक्रमित आहे. तर कोरोनामुळे सातजणांचा मृत्यू झाला, तर १८ रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना