शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: देशात रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:54 IST

१ लाख ८0 हजार झाले बरे; २४ तासांत १0 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशाच्या विविध भागांत कोरोनाचे १0 हजार ६६७ नवे रुग्ण आढळल्याने आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत या आजाराने ३८0 जणांचा बळी घेतला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूंचा आकडा ९९00 पर्यंत जाऊ न पोहोचला आहे.एकीकडे देशात रुग्णांची संख्या वाढत असली तरी ते बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आतापर्यंत १ लाख ८0 हजार रुग्ण बरे झाले आहेत आणि सध्या १ लाख ५३ हजार १७६ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. सोमवारी दिलेल्या आकडेवारीत रुग्णांच्या संख्येत ११ हजारांनी भर पडली होती. पण आजची माहिती पाहता, नव्या रुग्णांची संख्या काहीशी कमी झाली आहे. तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचा हा परिणाम आहे.महाराष्ट्रात मात्र गेल्या २४ तासांत २ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूमध्ये हा आकडा १८00 आणि दिल्लीमध्ये १५४७ इतका आहे. तामिळनाडूतील एकूण रुग्णांची संख्या आता ४६ हजार ५0४ झाली आहे आणि दिल्लीत ती ४२ हजार ८२८ आहे. गुजरातमध्ये २४ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातील ८0 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या चारही राज्यांत एकूण रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक आहे. सर्वाधिक म्हणजे १ लाख १० हजार ७४४ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. पण महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास ५० टक्क्यांच्या आसपास आहे.सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, दादरा-नगरहवेली, मेघालय, अंदमान-निकोबार आणि या पाच राज्ये वा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० ते ७० च्या आसपास आहे. गोव्यात गेल्या आठवड्यापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते. पण आता तिथे एकूण रुग्णांचा आकडा ५९२ झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.दिल्लीत चिंतादिल्लीमध्ये गेल्या २४ तासांतील रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली तरी ती झपाट्याने वाढत जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दिल्ली व केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेण्यात याव्यात, अशी शिफारस आयसीएमआरने केंद्र सरकारला केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या