शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जोवर लस नाही... तोवर सॅलरी नाही; बिहारमध्ये जिल्हाधिकारी साहेबांचं अजब फरमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 19:10 IST

लशींच्या तुटवड्यामुळे देशात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे हे फरमाण कुणालाही समजण्या पलिकडचे आहे. (bihar)

पाटणा - बिहारमधील सारण येथे जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजबच फरमाण जारी केले आहे. त्यांचे हे फरमान आता सर्वत्र चर्चेचा विषय झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की जो सरकारी कर्मचारी कोरोना लस घेणार नाही, त्याला पुढील आदेशापर्यंत सॅलरी दिली जाणार नाही. डॉ. नीलेश रामचंद्र देवरे, असे या जिलाधिकाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्या या फरमानाने सर्वच अवाक झाले आहेत.

लशींच्या तुटवड्यामुळे देशात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे हे फरमाण कुणालाही समजण्या पलिकडचे आहे. "सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना लस टोचून घ्यावी आणि यासंदर्भात कार्यालयाला माहिती द्यावी. तसेच, ज्या लोकांनी कोरना लस घेतलेली नाही, त्यांचे वेतन पुढील आदेशापर्यंत रोखले जाईल," असे या फरमानात म्हणण्यात आले आहे. आता कोरोनावरील उपचारासाठी ‘अँटीबॉडी कॉकटेल’ भारतातही उपलब्ध, एका डोसची किंमत 59,750 रुपये

यावर कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे, की लस जेव्हा उपलब्ध होईल त्याच वेळी ती घेता येईल. जे कर्मचारी 18+ वयोगटात येतात (18 ते  45 वयोगटात) त्यांच्यासाठी लशीचा स्लॉटच मिळत नाहीय. यामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.

खरेतर, जिल्हा आपत्ती विभागात काम करणारा एक 40 वर्षीय कार्यालय सहायक प्रकाश कुमार पांडे यांचे 9 मेरोजी कोरोनामुळे निधन झाले. यानंतर, जिलाधिकाऱ्यांना माहिती मिळाली, की मृत प्रकाश कुमार यांनी कोरोना लस घेतलेली नव्हती. तेव्हा त्यांनी प्रत्येकाला लस घ्यावीच लागेल आणि जे लस घेणार नाही, त्यांचे वेत रोखले जाईल, असे कठोर निर्देश दिले.

टाटांनी पुन्हा मनं जिंकली! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार देणारी घोषणा

सारण जिलाधिकारी डॉ. नीलेश रामचंद्र देवरे हे स्वतः MBBS आहेत. जॉइनिंगनंतर स्वतःला लस टोचून घेतल्यानंतर ते म्हणाले होते, कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी लस टोचून घ्यायला हवी. मात्र, आता त्यांनी काढलेल्या या आदेशाचा परिणाम जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर होणार आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील दतियाचे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनीही असाच आदेश काढला होता. यात, जो कर्मचारी लस घेणार नाही. त्याचे मे महिन्याचे वेतर रोखले जाईल, असे म्हणण्यात आले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसBiharबिहारcollectorजिल्हाधिकारी