शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायी; नीती आयोगाकडूनही दखल, महापालिकेचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:40 IST

CoronaVirus: अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे‘मुंबई मॉडेल’ प्रेरणादायीनीती आयोगाकडूनही दखलमहापालिकेचे केले कौतुक

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई महापालिकेची पाठ थोपटली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबईतील कोरोनाच्या व्यवस्थापनाची दखल घेत कौतुक केले आहे. (coronavirus niti aayog amitabh kant says inspirational mumbai model of corona management)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र,  महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. याची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि टीमचे कौतुक केले आहे.

“मोदी सरकारने आपले काम योग्य पद्धतीने केले असते, तर ही वेळच आली नसती”

मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी

केंद्रीय पद्धतीने बेडचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणे, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम निर्माण करणे, मुंबईचे कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचे अभिनंदन, असे ट्विट अमिताभ कांत यांनी केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने केले होते कौतुक

एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील कोरोना व्यवस्थापन मॉडेलचा दाखला दिला होता. न्या. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कोरोना व्यवस्थापनासंदर्भात मुंबई महापालिकेने तयार केलेलं मॉडेल देश आणि राज्यस्तरावर शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागतेय, मग मोदी सरकार काय करतंय?”

दरम्यान, मुंबई, ठाण्यासह अनेक मोठ्या शहरांत लक्षणीय रुग्णघट होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात रविवारी करोनाचे ४८,४०१ रुग्ण आढळले, तर ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी राज्यात ४८,६२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत रविवारी २,४०३ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCentral Governmentकेंद्र सरकारMumbaiमुंबई