शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
4
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
5
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
6
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
7
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
8
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
9
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
10
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
11
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
12
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
13
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
14
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
15
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
16
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
17
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
18
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
20
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅक, व्हाईट, यलो फंगसनंतर आता नवं संकट; आठ रुग्ण आढळल्यानं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:53 IST

Coronavirus News: कोरोना संकट संपता संपता संपेना; नवा फंगस आढळल्यानं चिंतेत भर

अहमदाबाद: कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचा धोका असताना आता आणखी एक नवा धोका समोर आला आहे. गुजरातमधील बडोद्यात कोरोना रुग्णांसोबत यातून मुक्त झालेल्यांना ऐस्पर्जलोसिस (Aspergillosis) फंगस इंफेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. आधीच ब्लॅक फंगसचे (म्युकोरमायकोसिस) रुग्ण वाढत असताना त्यात आता नवा फंगस आढळून आल्यानं वैद्यकीय क्षेत्राची चिंता वाढली आहे. नव्या फंगसचा धोका निर्माण झाल्यानं कोरोना रुग्णदेखीत चिंतेत सापडले आहेत.कोरोनामुक्त होत असताना या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोकाबडोद्यातील दोन सरकारी रुग्णालयांमध्ये म्युकोरमायकोसिसचे २६२ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील एका रुग्णालयात गेल्या आठवड्याभरात आठ जणांना ऐस्पर्जलोसिसची लागण झाली. कोरोना रुग्णांच्या उपचारांत वापरल्या जाणाऱ्या स्टेरॉईड्समुळे ऐस्पर्जलोसिसचा धोका वाढत आहे. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा हायड्रेट करण्यासाठी होणारा निर्जंतुकीकरण न केलेल्या पाण्याचा वापरही यासाठी कारणीभूत ठरत आहे. याच रुग्णालयात मल्टी ड्रग्सज रेजिस्टंस यीस्ट इंफेक्शन कँडिडा ऑरिसचे १३ रुग्ण आढळून आले आहेत.रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना पल्मोनरी ऐस्पर्जलोसिसची लागण झाल्याचं सर्वसामान्यपणे दिसून येतं. मात्र साइनस ऐस्पर्जलोसिसचा प्रकार पहिल्यांदाच समोर आल्याचं शहराच्या कोविड-१९ सल्लागार डॉ. शीतल मेस्त्री यांनी सांगितलं. कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ऐस्पर्जलोसिसची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र ऐस्पर्जलोसिस ब्लॅक फंगसप्रमाणे वेगानं पसरत नाही. मात्र तो अतिशय आक्रमक असतो, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस