शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

CoronaVirus News: 60 दिवसांत 50 कोटी जणांना देऊ लस; कॉर्पोरेट क्षेत्राने लसीकरणासाठी पुढे केला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:02 IST

कॉर्पोरेट क्षेत्राने लसीकरणासाठी पुढे केला हात; नीती आयोगाचा सकारात्मक प्रतिसाद

नवी दिल्ली : काेराेनाविरुद्ध लढ्यामध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन कार्पाेरेट क्षेत्रातील उद्याेजकांनी केली. त्या हाकेला नीती आयाेगानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लसीकरणामध्ये खासगी क्षेत्राला व्यापक भूमिका देऊन सहभागी करण्यात येणार असल्याचे नीती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी स्पष्ट केले. 

बेंगळुरू येथे एका कार्यक्रमात विप्राेचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी लसीकरणामध्ये खासगी क्षेत्राला सहभागी करून घ्यावे असे आवाहन सरकारला केले हाेते. या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामनही हजर होत्या. प्रेमजी म्हणाले की सरकारने खासगी क्षेत्राला सहभागी केल्यास ६० दिवसांमध्ये ५० काेटी जणांना लस देण्याची खात्री देऊ.  केंद्र सरकारने लसीकरणासाठी ३५ हजार काेटी रुपयांची तरतूद केली असून, आणखीही रकमेची सरकारने तयारी ठेवली  आहे. प्रतिव्यक्ती ७०० रुपये खर्च अपेक्षित धरून सुमारे ५० काेटी भारतीयांच्या लसीकरणासाठी ही तरतूद आहे. 

९६ लाखांहून अधिक चाचण्या

२१ फेब्रुवारी पर्यंत १ कोटी ५६ लाख ७१ हजार २८२चाचण्या झाल्या आहेत. यातील ९६ लाख ८८ हजार १४० चाचण्या या सरकारी प्रयोगशाळा अर्थात लॅबमध्ये झाल्या आहेत. ५९ लाख ८३ हजार १४७ चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या आहेत. सरकारी लॅबमधील एकूण चाचण्यापैकी ८४ लाख ६४ हजार ३३५ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 

‘सीरम इन्स्टिट्यूटने’ रुग्णालये व खासगी नर्सिंग हाेम्सना ३०० रुपयांमध्ये लस उपलब्ध करून दिल्यास शंभर रुपये अतिरिक्त शुल्क घेऊन प्रतिव्यक्ती ४०० रुपयांमध्ये व्यापक लसीकरण शक्य आहे,    - अझीम प्रेमजी, चेअरमन विप्रो लिमिटेड

खासगी क्षेत्राच्या क्षमतेचा वापर करून लसीकरणाची गती वाढविता येईल. काेराेनाच्या सध्या धाेकादायक ठरणाऱ्या नव्या लाटेविरुद्ध लसीकरण, हीच प्रमुख आशा आहे.- आनंद महिंद्र, चेअरमन, महिंद्र ग्रुप

लसीकरण जेवढे वेगाने करू तेवढे चांगले राहील. जगाने व भारताने लसीकरणाचे आव्हान स्वीकारले आहे. आपल्या लाेकांना लवकरात लवकर लस मिळावी, अशी अपेक्षा आहे,     - उदय कोटक,     एमडी, कोटक महिंद्र बँक

नव्या लाटेविरुद्ध लसीकरण, हीच प्रमुख आशा आहे. सरकारच्या उपक्रमाला औद्याेगिक क्षेत्र पूरक ठरू शकेल.    - टी. व्ही. नरेंद्रन,     एमडी, टाटा स्टील

लसीकरणाच्या मोहिमेत खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते लवकर पूर्ण होईल आणि रुग्णसंख्या तसेच मृत्यू यांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सरकारने हा पर्याय लवकरात लवकर अमलात आणायला हवा.    - देवेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय  संचालक, लोकमत समूह 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या