शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कर्नाटकातील चारपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 03:45 IST

उपमुख्यमंत्री अश्वथनारायण, पर्यटनमंत्री सी. टी. रवी, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, गृहमंत्री बसवराज बोम्मई या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले.

बंगळुरू : कोरोनाची लागण झालेल्या येथील एका कॅमेरामनच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइनमध्ये असून, दोन मंत्री मात्र खुलेपणाने फिरत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अश्वथनारायण, पर्यटनमंत्री सी. टी. रवी, वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर, गृहमंत्री बसवराज बोम्मई या चौघांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.स्थानिक वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनने२० एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला भेट दिली. त्याने या चारही मंत्र्यांच्या मुलाखतींचे चित्रीकरण केले. त्यानंतर काही दिवसांनी गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमण्णा यांचीही मुलाखत त्याने चित्रित केली. कोरोना व्यक्तीच्या संपर्कात येऊनही जरी संसर्ग झाला नसेल तरी त्या दुसऱ्या व्यक्तीने १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये राहावे असा नियम आहे. त्यामुळे कॅमेरामनच्या संपर्कात आलेल्यांपैकी दोन मंत्री होम क्वारंटाइनमध्ये आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री सुधाकर तसेच गृहनिर्माणमंत्री सोमण्णा यांनी ते केले नाही. सुधाकर तर मंड्या येथे दौºयावर जाऊन आले.चुकीचे वर्तन : काँग्रेसहोम क्वारंटाइनचा नियम न पाळणाºया मंत्र्यांवर टीका करताना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, ज्यांनी लोकांना आदर्श घालून द्यायचा ते मंत्रीच नियम पाळेनासे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या