शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४० लाखांवर; १३ दिवसांत १० लाख नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 07:22 IST

बळींचा आकडा ६९,५६१

नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ८६,४३२ नवे रुग्ण आढळून आले असून हा आजवरचा उच्चांक आहे. आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४०,२३,१७९ झाली आहे. कोरोना रुग्णांची ३० लाख संख्या अवघ्या १३ दिवसांत ४० लाखांवर पोहोचली आहे, तर या आजारातून ३१ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

कोरोना आजारातून बरे झालेल्यांचे प्रमाण ७७.२३ टक्के असून अशा व्यक्तींची एकूण संख्या ३१,०७,२२३ आहे. या आजारामुळे आणखी १,०८९ जण मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या ६९,५६१ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७३ टक्के इतका कमी राखण्यात यश आले आहे.

देशभरात सध्या ८,४६,३९५ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची संख्या एकूण रुग्णांच्या २१.०४ टक्के इतकी आहे. या संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही दिलासादायक गोष्ट असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

४ कोटी ७७ लाखांवर चाचण्या

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,७७,३८,४९१ झाली आहे. देशात दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचे लक्ष्य आयसीएमआरने ठेवले आहे.च्कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,६८७, कर्नाटकात ६,१७०, दिल्लीमध्ये ४,५१३, आंध्र प्रदेशात ४,२७६, उत्तर प्रदेशमध्ये ३,७६२, पश्चिम बंगालमध्ये ३,४५२, गुजरातला ३,०७६, पंजाबमध्ये १,७३९ इतकी आहे.

कोरोना रुग्णांची १० लाख संख्या २० लाख होण्यास २१ दिवस लागले. त्यापुढच्या १६ दिवसांत रुग्णसंख्या ३० लाखांवर गेली. त्यानंतर अवघ्या १३ दिवसांतच हा आकडा ४० लाखांहून अधिक झाला. कोरोना साथीच्या प्रारंभी रुग्णांची संख्या १ लाख व्हायला ११० दिवस व १० लाख रुग्ण होण्यासाठी ५९ दिवस लागले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत