शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याबाबत आज निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 03:38 IST

बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे

एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एक ते पंधरा जुलैदरम्यान होणारी बारावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरील चर्चा अंतिम टप्प्यात असून बुधवारी यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.न्या. ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाला माहिती देताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सरकार आणि सीबीएसईला विद्यार्थ्यांच्या चिंतेची जाणीव आहे. या मुद्यावर अधिकारी लवकरच निर्णय घेतील. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी एक दिवसासाठी तहकूब करण्याची विनंती करताना सांगितले की, अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाला कळविला जाईल. त्यानंतर कोर्टाने याप्रकरणाची सुनावणी २५ जूनपर्यंत स्थगित केली.काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, सीबीएसईला आधी घेतलेल्या परीक्षेच्या आधारे निकाल घोषित करण्यास आणि उर्वरित विषयांच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार गुणांच्या सरासरीच्या आधारावर गुण निश्चित करण्याचे निर्देश दिले जावेत. बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घोषित करणारी सीबीएसईची १८ मे रोजीची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारीही सर्वोच्च न्यायालयात अन्य एक याचिका दाखल करण्यात आली आहे.यात भारतीय शालेय प्रमाणपत्र परिषदेने (आयसीएसई) कोविड-१९ साथीदरम्यान घेतलेली परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आयसीएसईच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात सरकारच्या निर्णयाचे पालन केले जाईल. तथापि, कोर्टाने म्हटले की, आयसीएसई या मुद्यांवर स्वत: निर्णय घेऊ शकते.मेहता यांनी यावेळी सांगितले की, सीबीएसई परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आयसीएसईला बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी २५ जून रोजी ठेवली आहे.