शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

CoronaVirus News: कैक पटीनं वाढणार कोरोनाचा कहर? ट्रिपल म्युटंटच्या शक्यतेनं खळबळ; महाराष्ट्राच्या चिंतेत मोठी भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 17:16 IST

CoronaVirus News: कोरोनाचं नवं रुप आणखी धोकादायक ठरण्याची शक्यता; संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी बातमी

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्व विक्रम मोडीत काढत प्रशासनाची चिंता वाढवली असताना आता धोका आणखी वाढला आहे. कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. शास्त्रीय भाषेत हा व्हेरिएंट B.1.167 म्हणून ओळखला जातो. या व्हेरिएंटला रोखण्याचा मार्ग अद्याप तरी सापडलेला नाही. त्यात आता या व्हेरिएंटचं आणखी एक म्युटेशन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास संपूर्ण देशाची चिंता वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 दिवसांचा 'कडक' लॉकडाऊन गरजेचा, कॅबिनेटमध्ये चर्चाडबल म्युटंट व्हेरिएंटमध्ये आणखी एक म्युटेशन झाल्यानं त्याचं रुपांतर ट्रिपल म्युटंटमध्ये झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. डबल म्युटंट व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये तिसरं म्युटेशन झालं आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नवं म्युटेशन दिसून आलं आहे. सध्या या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.कोरोना लसींची आयात अधिक सुलभ होणार, मोदी सरकार अजून एक मोठा निर्णय घेणारमहाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगडमधून घेण्यात आलेल्या १७ नमुन्यांमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डबल म्युटंट व्हेरिएंटमुळेच या राज्यांमधील कोरोना रुग्णांचा आकडा वेगानं वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यातच आता ट्रिपल व्हेरिएंट समोर आल्यानं चिंता आणखी वाढली आहे.डबल म्युटेंट व्हेरिएंट आधीपेक्षा जास्त धोकादायकनॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलनं (NCDC) काही महिन्यांपूर्वीच डबल म्युटंट व्हेरिएंटची माहिती दिली होती. या व्हेरिएंटला शास्त्रज्ञांनी B.1.167 नाव दिलं होतं. यामध्ये दोन प्रकारचे (E484Q आणि L452R) म्युटेशन्स आहेत. हा कोरोनाचा असा विषाणू आहे, ज्यामध्ये दोनवेळा बदल झाला आहे. विषाणू स्वत:ला दीर्घकाळ प्रभावी ठेवण्यासाठी सातत्यानं स्वत:च्या रचनेत बदल करतो. स्वत:चा बचाव करण्यासाठी विषाणू परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणतो. त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना विषाणूचा दुसरा म्युटंट व्हेरिएंट धोकादायक मानला जात होता. त्यात आता ट्रिपल म्युटंट आढळून आल्याच्या शक्यतेनं चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या