शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण? किती दिवस राहणार?; समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 11:53 IST

CoronaVirus News: पुढील काही महिन्यांत देशात तिसऱ्या लाटेचा धोका

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. मे महिन्यात देशात कोरोनानं हाहाकार माजवला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरू लागली. महिना संपेपर्यंत दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ लाखांच्या खाली आली. यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं याबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.आपलेही झाले परके! पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने फिरवली पाठ; पत्नीने दिला मुखाग्नीकोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल आणि तिचा जोर ९८ दिवस कायम राहील, अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय अनुभव आणि तिथली आकडेवारी लक्षात घेऊन एसबीआयनं अहवाल तयार केला आहे. 'तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा फारशी वेगळी नसेल. मात्र व्यवस्थित पूर्वतयारी केल्यास जीवितहानी कमी करता येऊ शकेल,' असं एसबीआयनं अहवालात नमूद केलं आहे.कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत'जगातील प्रमुख देशांचा विचार केल्यास तिसऱ्या लाटेचा कालावधी साधारणत: ९८ दिवसांचा राहिला आहे. तर दुसरी लाटेची तीव्रता सरासरी १०८ दिवस पाहायला मिळाली आहे,' अशी आकडेवारी एसबीआयच्या अहवालात आहे. एप्रिल-मेमध्ये देशात कोरोनाची दुसरी लाट आली. मे महिन्यात लाटेनं टोक गाठलं. मेच्या पहिल्या आठवड्यात जवळपास दररोज ४ लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते. मे महिन्यात देशात ९० लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याच देशात एका महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १.२ लाखांहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेसाठी योग्य तयारी केल्यास हाच आकडा ४० हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचं प्रमाण २० टक्के होतं. तिसऱ्या लाटेदरम्यान ते ५ टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या