शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News: नव्या कोरोना रुग्णांचा दहा महिन्यांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:43 IST

बळींच्या संख्येत घट; रविवारी आढळले १२,०५९ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या दररोजच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. रविवारी या संसर्गाने बळी गेलेल्यांची संख्या अवघी ७८ होती. ही संख्या १०० पेक्षा कमी असण्याची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. देशात रविवारी कोरोनाचे १२,०५९ नवे रुग्ण आढळून आले. गेल्यावर्षी १ मेपासून आजवर आढळलेल्या दररोजच्या नव्या कोरोना रुग्णसंख्येचा हा नीचांक आहे.उपचाराधीन रुग्णांची संख्या १,४८,७६६ असून, त्यांचे प्रमाण १.३७ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ५ लाखांपेक्षा अधिक असून, त्याचे प्रमाण ९७.२० टक्के आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०८,२६,३६३ असून त्यापैकी १,०५,२२,६०१ जण बरे झाले आहेत. रविवारी कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के होता. जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० कोटी ६३ लाख असून, त्यापैकी ७ कोटी ८० लाख जण बरे झाले, तर उपचाराधीन रुग्णांची संख्या २ कोटी ५८ लाख आहे. जगात कोरोनामुळे २३ लाख २१ हजार लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेमध्ये २ कोटी ७५ लाख कोरोनाचे रुग्ण असून त्यापैकी १ कोटी ७२ लाख लोक बरे झाले.आतापर्यंत ५७ लाख लोकांना दिली कोरोना लस५७ लाख लोकांना देशामध्ये आतापर्यंत कोरोना लस देण्यात आली आहे. जगामध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली असून, त्यानंतर दुसरा क्रमांक ब्रिटनचा लागतो. या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी आहे.या सर्वांना लसीकरण मोहिमेच्या १,१५,१७८ सत्रांमध्ये कोरोना लस देण्यात आली. शनिवारी ३,५८,४७३ जणांना कोरोना लस टोचण्यात आली. १६ जानेवारीला ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला आहे, त्यांना लसीचा दुसरा डोस १३ फेब्रुवारी रोजी दिला जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या