शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित डॉक्टरला बेड्या घालून पोलिसांची मारहाण, आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 07:02 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या एन-९५ प्रकारच्या मास्कची आंध्र प्रदेशमधील रुग्णालयात कमतरता आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशात निलंबित केलेल्या एका डॉक्टरला विशाखापट्टणम पोलिसांनी बेड्या घालून रस्त्यावरून फरपटत नेले तसेच त्याला बेदम मारहाण केल्याचा अतिशय संतापजनक प्रकार नुकताच घडला आहे. या डॉक्टरला अमानुष वागणूक देणाऱ्या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे.कोरोना रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या एन-९५ प्रकारच्या मास्कची आंध्र प्रदेशमधील रुग्णालयात कमतरता आहे. हे सत्य जगासमोर आणल्याने राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या डॉ. सुधाकर यांना पोलिसांनी ही पाशवी वागणूक दिली आहे. त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत झळकताच खळबळ माजली.डॉ. सुधाकर यांना विशाखापट्टणमचे पोलीस अमानुष पद्धतीने वागवत असताना, असंख्य लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. या डॉक्टरच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या व त्यांना रस्त्यावरून फरफटत रिक्षापर्यंत आणले. मग त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.कोरोना रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना सरकारी यंत्रणा एन-९५ मास्क देत नसल्याचा व एक मास्क पंधरा दिवसांपर्यंत वापरण्यास सांगितले जात असल्याचा आरोप डॉ. सुधाकर यांनी मार्च महिन्यात केला होता. त्यानंतर त्यांच्यावर राज्याच्या आरोग्य खात्याने निलंबनाची कारवाई केली. डॉ. सुधाकर खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आंध्र प्रदेश सरकारने केला होता. या डॉक्टरला अमानुष पद्धतीने वागविणाºया पोलीस शिपायाला तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आर. के. मीना यांनी दिली आहे. डॉ. सुधाकर यांच्याशी पोलीस अमानुष पद्धतीने वागल्याबद्दल विरोधी पक्ष तसेच नेटिझनने जोरदार टीका केली आहे. तेलगू देसम, भाकप व अन्य पक्षांनी पोलिसांचा निषेध केला आहे.पोलीस आयुक्त काय म्हणाले?- विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त आर. के. मीना यांनी असा दावा केला की, या शहरातील अक्कयापालेम भागामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एक माणूस अडथळे आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली.- ती व्यक्ती म्हणजे डॉ. सुधाकर होते. त्यांना काबूत आणण्याचा प्रयत्न केला असता ते पोलिसांशी अतिशय वाईट पद्धतीने वागले. त्यांनी पोलीस शिपायाचा मोबाईल फेकून दिला. डॉ. सुधाकर हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रासलेले आहेत, असे मीना म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर